Powai hostage case Saam Tv
Video

Mumbai Hostage: आत्महत्या करायची होती, पण अचानक प्लान बदलला; २० मुलांना ओलिस ठेवणारा रोहित आर्य नेमकं काय म्हणाला?

Powai Hostage Case: पवईमध्ये एका माथेफिरूने २० मुलांना ओलिस ठेवल्याची घटना समोर आली. ऑडिशनच्या नावाखाली या मुलांना बोलावून त्याने त्यांना एका खोलीत कोंडून ठेवलं. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपीला अटक केली.

Priya More

मुंबईतील पवई या उच्चभ्रू परिसरात एका व्यक्तीने जवळपास २० ते २२ अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवल्याने खळबळ उडाली. रोहित आर्य असं या माथेफिरूचे नाव आहे. तो पुण्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. रोहितने प्लान करून या मुलांना ओलिस ठेवले. पवईतील स्टुडिओमध्ये या मुलांना ऑडिशनसाठी बोलावून आरोपीने त्यांना ओलिस ठेवले. आरोपीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्याने स्टुडिओ पेटवून देण्याची धमकी दिली. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करत मुलांची सुखरूप सुटका केली.

रोहित आर्यने पवईतील एका स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या १५ वर्षांखालील मुलांना ओलिस ठेवले. आपल्याला कोणतीही पैशांची मागणी नसून केवळ काही लोकांशी चर्चा करायची असल्याचे तो म्हणाला. त्याने व्हिडिओमध्ये सांगतिले की, 'मी रोहित आर्य. आत्महत्या करण्याचा मी प्लान केला होता, पण अचानक प्लान बदलला आणि मी २० मुलांना ओलिस ठेवले आहे. माझ्या काही मागण्या आहेत. मला काही लोकांशी बोलायचे आहे. माझे काही प्रश्न आहेत मला त्याची उत्तरं पाहिजेत. मी कुणी दहशतवादी नाही. पण माझ्या प्रश्नांची उत्तर पाहिजे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Accident: रेसच्या नादात भाजप नगरसेवकाच्या मुलाने घेतला दाम्पत्याचा जीव; अपघाताचा थरारक CCTV Video आला समोर

दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारचा अॅक्शन प्लॅन तयार; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग

भाजपच्या महिला आमदाराला विषबाधा; व्हेंटिलेटरवर उपचार, प्रकृती चिंताजनक

कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा नवा किरण; कॅन्सरला हरवणं शक्य, क्लिनिकल ट्रायलमध्ये शास्त्रज्ञांना मोठं यश

कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा; पुणे मनपा आयुक्तांचा व्यापाऱ्यांना कठोर इशारा

SCROLL FOR NEXT