Mumbai rain saam tv
Video

Maharashtra Politics: तुंबईवर राजकारण तापले! भाजप - ठाकरे गटामध्ये जुंपली; गिरीश महाजनांची 'त्या' टीकेवर आदित्य ठाकरेंचा पलटवार|VIDEO

Monsoon Mayhem in Mumbai: एकीकडे मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे यावरूनच राजकारण चांगलाच तापल्याचे दिसून येत आहे.

Omkar Sonawane

राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्यानंतर सोमवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत सर्वत्र पाणी साचल असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने मुंबई ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

यावर मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार करत म्हणाले की, यश अपयश हा विषय नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे. नळावरच्या भांडणासारख करू नका दहा गोष्टी आम्हालाही बोलता येतील असे प्रत्युत्तर त्यांनी आदित्य ठाकरेना दिले. यावर आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून कोण नळावरच्या भांडणासारख भांडत आहे? कोणता पक्ष भांडत आहे? जर मुंबईच्या लोकांचे हाल होत असतील आणि यांना हे नळावरचे भांडण वाटत असतील तर गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी महाजन यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Spilt : ममता बॅनर्जींचे २० खासदार 'नॉट रीचेबल'; भाजप मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीत गुप्त बैठक, महाराष्ट्रासारखा पक्ष फुटणार?

Empty Stomach Fruits: रिकाम्या पोटी ही फळं चुकूनही खाऊ नयेत

Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Silver Price Today: सोन्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT