Mumbai Local Saam Tv
Video

Mumbai Local: मुसळधार पावसाचा फटका, एसी लोकलमध्ये गळती; महिलांचा छत्री घेऊन प्रवास; पाहा VIDEO

Mumbai Local Video: मुंबईतील एसी लोकलमध्ये पावसामुळे गळती होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पाणी पडत असल्यामुळे प्रवाशांना छत्री उघडून प्रवास करावा लागला. त्यामुळे महिला प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Priya More

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होताना दिसत आहे. या पावसाचा फटका लोकलसेवेला देखील बसत आहे. आधीच लोकल उशिराने धावत आहेत. त्यात आता एसी लोकलमध्ये पावसाच्या पाण्यामुळे गळती होत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. एसी लोकलमध्ये पाणी गळती होत असल्यामुळे महिला प्रवाशांना छत्री उघडी करून बसावे लागले. तर काही महिला प्रवाशांनी डोक्यावर प्लास्टिकची पिशवी ठेवून प्रवास केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे ते सीएसएमटी एसी लोकलमध्ये हा प्रकार घडला. ही लोकल सकाळी ९.०३ च्या सुमारास ठाण्यावरून सुटली. लोकलमध्ये पावसामुळे पाणी गळत असल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. पावसाचे पाण्याचा त्रास होत असल्यामुळे अनेक प्रवाशांना डोक्यावर छत्री आणि प्लास्टिक पिशव्या घेऊन प्रवास करावा लागला. एसी लोकलमधून प्रवास करण्यासाठी महागडे तिकीट काढून सुद्धा प्रवाशांना हा अशापद्धतीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवात ३८० स्पेशल ट्रेन; पनवेल-चिपळूण दरम्यान धावणाऱ्या ६ ट्रेन कुठे-कुठे थांबणार?, वाचा

Maharashtra Live News Update: पिसाळलेल्या कुत्र्याची राजगुरुनगर शहरात दहशत..

Hair Colour: हेअर कलर करायला आवडतं? पण शरीरावर होणारे 'हे' गंभीर परिणाम वाचाच

गाडी चालवताना अचानक हँडलमधून आवाज, पाहिलं तर आत लपलं होतं अजगराचं पिल्लू, पाहा थरारक VIDEO

Virat Kohli Retirement : विराट कोहली IPLमधूनही 'रिटायर' होणार, क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारा दावा

SCROLL FOR NEXT