Mumbai rain Saam
Video

Mumbai Rain: मुंबईला पावसाचा तडाखा; अंधेरीतील सबवे पाण्याखाली, रस्ते जलमय | VIDEO

Heavy Rain in Mumbai: मुंबईतील अंधेरी सबवे मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. पाच फूटांपर्यंत पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा सल्ला देण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

मुंबईला पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. अंधेरी सबवेमध्ये तब्बल पाच फूटांपर्यंत पाणी साचलं आहे. सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मुंबई वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्या आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सबवेतील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

मागील १५ मिनिटांपासून अंधेरी सबवे बंद असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची दमछाक उडाली आहे. पश्चिम उपनगरांतील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा किंवा योग्य नियोजन करूनच बाहेर पडावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT