Andheri Subway Water News  Saam TV
Video

Andheri Subway Rain : अंधेरी सब-वे पूर्णत: पाण्याखाली, रस्त्यावर ५ फुटांपर्यंत पाणी; पाहा VIDEO

Andheri Subway Water News : अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सब-वे देखील पाण्याखाली गेला असून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सबवेवर ५ फुटापर्यंत पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.

Satish Daud

मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले असून सखल भागात पाणी शिरलं आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सब-वे देखील पाण्याखाली गेला असून सध्या अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सबवेवर ५ फुटापर्यंत पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे अंधेरी पूर्वेकडील अंधेरी सभेला जोडणारा जो मुख्य रस्ता आहे तो रस्ताच मुसळधार पावसात वाहून गेला आहे. विशेष बाब म्हणजे, हा रस्ता दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आला होता. नागरिकांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात आवाजही उठवला होता.

आज हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली वाहून गेल्याने रस्त्याच्या कामावर नागरिकांनी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. पावसामुळे मालाड भुयारी मार्ग बंद देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भुयारी मार्गाच्या आत एक कार अडकली आहे आणि पाण्यात तरंगताना दिसत आहे. गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT