Pune Mumbai Expressway Traffic Jam Due To Gas Tanker accident Saam tv
Video

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जाम, प्रवाशांचे हाल; प्रशासन IRB कुठे गायब? VIDEO

Mumbai Pune Expressway Traffic Jam Due To Gas Tanker: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर पलटी झाल्याने भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 20 तासांहून अधिक काळ प्रवासी अडकले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Omkar Sonawane

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही मुंबई-पुणे प्रवास करणार असाल तर जरा थांबा. या मार्गावरून प्रवास टाळायला हवा. कारण एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. काल संध्याकाळी खंडाळा घाटात आडोशी बोगदा या ठिकाणी एक केमिकल टँकर उलटला. त्यामधून ज्वालाग्रही गॅस लिकेज होतोय. प्रशासनाकडून टँकर हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र तोपर्यंत वाहनांच्या सुरक्षेसाठी मुंबईकडील मार्ग बंद करण्यात आलाय. त्यामुळे दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून आज एक्सप्रेसवेचा प्रवास शक्यतो टाळावा असं आवाहन करण्यात येतंय.

जवळपास 23 तास उलटून गेले तरीही पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील परिस्थिती जैसे थे आहे. काल मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाला होता. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली, त्यामुळे वाहनांच्या तब्बल 15 ते 20 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अद्यापही गॅस टँकरमधून लिकेज सुरूच आहे. आज दुपारी पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक लेन आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसल्याने प्रशासनाकडून वाहनचालकांना अजूनही पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॉकरच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात दाखल

Dapoli Tourism : धबधब्याचा खळखळाट अन् निसर्गाची जादू, दापोलीच्या कुशीत लपलाय सुंदर पिकनिक स्पॉट

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तांनी थिएटर हाऊसफुल्ल; 'देऊळ बंद २'ची विक्रमी घोडदौड कायम, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची छप्परफाड कमाई

केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजा, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली; असे असतील नवे दर

Jeera Rice Recipe : जीरा राईस नेहमी चिकट होतो? ही ट्रिक फॉलो, फक्त 15 मिनिटांत तयार होईल डीश

SCROLL FOR NEXT