केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजा, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली; असे असतील नवे दर

Salon Rates Revised : वाढत्या महागाईमुळे महाराष्ट्र नाभिक असोसिएशनने सेवा शुल्कात २० टक्के वाढ जाहीर केल्याने महाराष्ट्रभरातील सलून सेवा महाग झाल्या आहेत.
केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजा, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली; असे असतील नवे दर
Published On

वाढत्या महागाईचा मोठा फटका आता सलून व्यवसायालाही बसला आहे. वाढते इंधनाचे दर, महाग झालेली आंतरराष्ट्रीय व स्थानिक सौंदर्यप्रसाधने आणि वाढलेला दैनंदिन व्यवसाय खर्चामुळे 'महाराष्ट्र नाभिक महामंडळाने' सलून सेवांच्या दरात तब्बल 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाभिक महामंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार, ही नवीन दरवाढ आजपासून राज्यभरात अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे.

शॅम्पू, हेअर कलर, जेल, वॅक्स यांसारख्या दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सलून व्यावसायिकांवरील आर्थिक ताण कमालीचा वाढला होता. या वाढत्या महागाईत आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि कारागिरांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हा दरवाढ करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होतं, असं स्पष्टीकरण नाभिक महामंडळाकडून देण्यात आलंय. दरम्यान या दरवाढीमुळे आता केस कापणे, दाढी करणे, हेअर कलर, फेशियल आणि इतर सर्व प्रकारच्या सेवांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील.

केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजा, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली; असे असतील नवे दर
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! पत्नीसोबत उघडा जॉइंट खातं अन् महिन्याला कमवा ₹8,633 रुपये

व्यावसायिक अडचणीत

अनेक वर्षांपासून सलून व्यावसायिक अतिशय कमी नफा ठेवून व्यवसाय करत होते. वाढत्या महागाईत जुने दर कायम ठेवून व्यवसाय चालवणे आणि दुकानाचा खर्च भागवणे पूर्णपणे कठीण झालंय. तसेच काही महिन्यांत दुकानांची वाढलेली व्यावसायिक वीजबिले, वाढते दुकानभाडे, स्थानिक कर यासह व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्त्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील सलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच ही दरवाढ लागू करण्यात आल्याचं नाभिक महामंडळाने सांगितलंय.

असे असतील नवीन दर

प्रिमियम सलून दुकान

दाढी- 200 ते 500 रुपये

कटिंग- 500 ते 1000 रुपये

हेअर कलर - 700 ते 1000 रुपये

फेशियल - 2000 ते 3000 रुपये

हेअर ट्रिटमेंट- 3000 ते 5000

मेकअप (ब्रायडल)- 7000 ते 10000 रुपये

मेकअप (ग्रुम) - 2000 ते 4000 रुपये

एसी सलून दुकानमधील दर

दाढी - 100 ते 200 रुपये

कटिंग- 150 ते 350 रुपये

हेअर कलर - 300 ते 500 रुपये

फेशियल - 500 ते 1500 रुपये

हेअर ट्रिटमेंट - 1500 ते 3000 रुपये

मेकअप (ब्रायडल) - 3000 ते 7000 रुपये

मेकअप (ग्रुम) 1000 ते 3000 रुपये

ग्रामीण भागातील सलूनचे दर

दाढी - 50 ते 70 रुपये

कटिंग - 80 ते 100 रुपये

हेअर कलर- 80 ते 100 रुपये

फेशियल- 200 ते 500 रुपये

हेअर ट्रिटमेंट- 200 ते 500

मेकअप (ब्रायडल)- 1500 ते 3000 रुपये

मेकअप (ग्रुम) - 500 ते 1500 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com