Mumbai Bike Taxi Saam Tv
Video

Bike Taxi: रॅपिडोसह ओलाविरोधात आणखी एक गुन्हा, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Police Action Against Bike Taxi: मुंबई आणि नाशिकमध्ये बाईक टॅक्सीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. रॅपिडोसह ओलाविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

मुंबईत बाईक टॅक्सीवर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत रॅपिडोसह ओलाविरोधात आणखी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोली पोलिसांनी परवानगी नसताना सुद्धा बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील बाइक टॅक्सीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना नसताना शहरात बाइक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी शहरात ही सेवा सुरू झाली होती. मोटार वाहन निरीक्षक योगेश सपिके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, अॅपद्वारे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत शासनाची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार प्रवासी वाहतूक करण्यास प्रोत्साहन देत आर्थिक फायदा मिळवणाऱ्या ट्रान्सपोर्ट प्रा. लि. रॅपिडो कंपनीच्या संचालकांविरोधात तक्रार दिली आहे. संबंधित कंपनीने नाशिक आरटीओकडे परवानगी घेतली नसल्याने गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पंचवटी पोलिस ठाण्याअंतर्गत सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT