Nashik News : रीलचा नाद लय बेक्कार! महागड्या बाइक चोरून धूम ठोकायचे, असे अडकले पोलिसांच्या सापळ्यात

Nashik Crime News : नाशिकमध्ये काही तरुणांनी सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी महागड्या दुचाकी गाड्या चोरल्याची माहिती समोर आली आहे. या चोरांना नाशिक पोलिसांनी शिर्डी येथून अटक केली आहे.
Thefts stole expensive bikes for making reels in nashik
Thefts stole expensive bikes for making reels in nashikMeta Ai
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

सोशल मीडियाचे वेड लोकांकडून काय करवून घेईल सांगता येणार नाही. व्हायरलच्या जगात टिकण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. रील फीचर सुरु झाल्यापासून तर सगळ्या गोष्टींचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळते. प्रसिद्ध होण्यासाठी, लाईक्ससाठी काहीजण स्टंटबाजी करतात, तर काही अश्लील चाळे करतात. एकाने सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी महागड्या गाड्या चोरल्याची माहिती समोर आली आहे.

पैसे नसल्याने गरज म्हणून किंवा उपजीविकेसाठी काहीजण चोरी करतात. काहीजण मज्जा वाटते म्हणून चोरी करतात. पण रील बनवायची आहे म्हणून चोरी केल्याचे पहिल्यांदा ऐकण्यात आले आहे. या चोरांना नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्थानकातील पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेतले आहे. हे चोर सध्या पोलीस कोठडीत आहेत.

नाशिकमधील भद्रकाली पोलीस स्थानकाच्या हद्दीत दोन बाईक्स गेल्याची तक्रार दाखल झाली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांना चार जण चोरी करुन पळाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. पुढे पोलिसांनी चारही आरोपींना शिर्डीहून अटक केली.

Thefts stole expensive bikes for making reels in nashik
GBS Case In Satara : पुणे, नागपूरनंतर साताऱ्यात जीबीएसचा शिरकाव? ४ संशयित रुग्ण आढळले

चार आरोपींपैकी दोन जण हे विधी संघर्षित बालक असल्याचे म्हटले जात आहे. या चोरांकडून पोलिसांनी तब्बल नऊ लाख रुपये किंमतीच्या महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यातील दोन गाड्या नाशिकच्या, तर तीन गाड्या संगमरनेरच्या असल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी आणखी किती गाड्या चोरल्या आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत.

Thefts stole expensive bikes for making reels in nashik
Nashik City News : नाशिककरांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद, काय आहे कारण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com