Lalbaugcha Raja Karyakarte Clash With Police Saam Tv
Video

Lalbaugcha Raja: लालबागच्या कार्यकर्त्यांची पुन्हा अरेरावी, महिला पोलिसांशी घातली हुज्जत; VIDEO पाहा

Lalbaugcha Raja Karyakarte Clash With Police: लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घाल्याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांच्या अरेरावीची आणखी एक घटना समोर आली आहे. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांसोबत हुज्जत घातली. या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना स्टेजवर चढण्यास विरोध केला. त्यावेळी लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांवर आरेरावी करण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ केला. यावेळी एका महिला पोलिसाने हात जोडून लालबागच्या कार्यकर्त्यांना विनंती केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. अनेक ठिकाणी स्टेज बांधण्यात आले आहेत. या स्टेजवर पोलिस उभे होते. अशामध्ये लालबागच्या राजाच्या महिला कार्यकर्त्यांनी स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलांना विरोध केला. तर त्यांनी थेट पोलिसांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका महिला पोलिसाने तर हात जोडून विनंती करत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मुंबईत हिट अँड रनचा थरार, भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक; आरोपी फरार

Maharashtra Live News Update: वसईतील स्वघोषित भोंदू बाबावर गुन्हा दाखल

Raw Mango Recipe: कच्चा कैरीपासून बनवा 5 चटपटीत पदार्थ, तोंडाला सुटेल पाणी

Lockdown: भारतात लॉकडाऊन लागणार का? केंद्र सरकारकडून आली अधिकृत माहिती, वाचा लेटेस्ट अपडेट

Paytm, PhonePe, Google Pay मधून पैसे गायब होतायेत? AutoPay लगेच बंद करा; १ सेकंदात करा प्रोसेस

SCROLL FOR NEXT