mumbai metro aqua line 3  Saam Tv
Video

Mumbai Metro Line 3: भुयारी मेट्रोचा ऐतिहासिक टप्पा,अ‍ॅक्वा लाईन लवकरच सेवेत

Mumbai Metro 3 latest update: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कामगिरी केली आहे. आचार्य अत्रे ते कफ परेड हा मेट्रोमार्ग लवकरच प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज मेट्रो ३ ने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भुयारी मेट्रोने कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंत यशस्वी धाव पूर्ण केली आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) साठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. लवकरच मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे. आचार्य अत्रे ते कफ परेड हा मेट्रोमार्ग प्रवासी सेवेसाठी सुरू करण्याच्या दिशेने आता महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

एकूण ३३.५ किमी लांबीच्या या मार्गातील पहिला टप्पा १२.६९ किमी आरे-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ७ ऑक्टोबर २०२४ पासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर दुसरा टप्पा, ९.७७ किमी लांबीचा (धारावी ते आचार्य अत्रे चौक), वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे, आणि या मार्गावर नियमित चाचण्या सुरू आहेत. या टप्प्यामुळे सात महत्त्वाची स्थानके परस्पर जोडली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार : प्रफुल्ल पटेल

Famous Youtuber: प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट; नेटकऱ्यांना बसला धक्का म्हणाले, 'हा पण ट्रेंड...'

Long Hair Gajra Hairstyle: लांब केसांसाठी गजरा माळणाच्या 5 युनिक हेअरस्टाईल्स, पारंपारिक लूक दिसेल उठून

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचा राजीनामा, कारण काय?

SCROLL FOR NEXT