dhule crime news
dhule crime news Ai image

Dhule Crime: मुंबई-आग्रा महामार्गावर घडला थरार; दोघे दुचाकीवर बसले होते, संशयाची पाल चुकचुकली अन्...

Dhule News: धुळे शहर व परिसरात दिवसागणिक चोरीच्या घटना वाढत चालल्या होत्या. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. यातच आज धुळे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Published on

धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या मोबाईल लुटीच्या घटनेचा अखेर उलगडा झाला आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे.

भूषण आहिरे, साम टीव्ही

धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावरील नागपूर-सुरत बायपास ब्रिजखाली एका अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवर बसलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी महामार्गावर वाहनधारकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवत लुटीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

dhule crime news
Dhule Crime : भाड्याने वाहने नेत परस्पर विक्री; सहा जणांची टोळी धुळे पोलिसांच्या ताब्यात

अटक करण्यात आलेले आरोपी गौरव ऊर्फ भंडाऱ्या लक्ष्मण अरदले आणि अभय अशोक झोटे हे यापूर्वीही अशा गुन्ह्यांत सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या ताब्यातून लुटलेला नामांकित कंपनीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टिव्हा दुचाकी आणि लुटीवेळी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.या घटनेनंतर महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच पुढील तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.

dhule crime news
Dhule Crime News: कापूस व्यापाऱ्यांची लूट करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या; मुद्देमाल जप्त, धुळे पोलिसांची कारवाई

काही दिवसांपूर्वी 10 मोटरसायकलीसह सराईट चोराच्या आवळल्या होत्या मुसक्या

अगदी काही दिवसांपूर्वी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर परिसरात एका सराईत गुन्हेगाराला तब्बल दहा मोटरसायकलींसह अटक केली होती. दुचकीच्या वाढत्या तक्रारींचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोराच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याच्याकडून 3 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com