Mumbai Local Train Update Saam tv
Video

Local Accident : कामावर जायची लगबग, लोंबकळत प्रवास; धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू | VIDEO

Mumbai Local Train Update : धावत्या लोकलमधून पडून २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात घडली आहे. मंगळवारी कामासाठी घरातून निघाला होता, त्यावेळी दुर्देवी घटना घडली.

Namdeo Kumbhar

Thane Local Accident News : ठाण्याजवळ धावत्या लोकलमधून पडून २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकल रेल्वेतून (Kalyan To Mumbai CST local Train) पडून तरूणाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव अनिस अहमद असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २६ वर्षीय अनिस हा कल्याण पूर्वेतील पावसे नगर येथील राहणारा आहे. मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली आहे. अनिस सकाळी कामासाठी निघाला होता. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यमुळे दरवाजात लोंबकळत (Mumbai Local News) प्रवास करत होता. त्यावेळी तोल जाऊन तो खाली कोसळला. यामध्ये अनिस गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखळ केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT