Commuters wade through waterlogged Dadar station after heavy overnight rains lashed Mumbai. Saam Tv
Video

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाने कहर; दादर स्थानक पाण्याखाली, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Heavy Rains Lash Mumbai: मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने कहर केला असून दादर स्थानक पाण्याखाली गेले आहे. नागरिकांची मोठी तारांबळ होत असून हवामान खात्याने मुंबई, रायगड व कोकणात रेड अलर्ट दिला आहे.

Omkar Sonawane

मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

दादर पश्चिम रेल्वेस्थानक पाण्याखाली गेले.

प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई, रायगड, कोकणात रेड अलर्ट आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी.

मुंबई : मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून संततधार स्वरूपात बरसत आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाच्या तडाख्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. विशेषतः दादर पश्चिम रेल्वेस्थानक पाण्याखाली गेले असून त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. सकाळी ऑफिस आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबईसह रायगड आणि कोकणात रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idol Dahi Handi 2025 : महिला, अंध व दिव्यांग गोविंदांसाठी दादरमध्ये अनोखी दहीहंडी|VIDEO

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

रात्री आक्रित घडलं; संततधारेमुळे भिंत खचली, गाढ झोपेत वृद्ध दाम्पत्यांच्या अंगावर पडली; जागीच मृत्यू

Maharashtra Politics : "ठाकरे बंधू एकत्र यावेत ही लोकांची इच्छा" माजी आमदार वैभव नाईकांनी दिले ठाकरे बंधूंच्या एकीचे संकेत

Mumbai Dahi Handi History: मुंबईत कधीपासून सुरू झाला दहीहंडी उत्सव, 100 वर्षाचा जुना इतिहास

SCROLL FOR NEXT