Sanjay Raut PC SaamTv
Video

Sanjay Raut News : ते ठाकरे आहेत, तर मी पण राऊत आहे; राऊतांचा राज ठाकरेंना खणखणीत टोला

Sanjay Raut Criticized Raj Thackarey : राज ठाकरे हे ठाकरे असतील तर मी सुद्धा संजय राऊत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मला घडवलं आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

Saam Tv

राज ठाकरे यांची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली असते. भाजपच्या नादी लागलेला माणूस अजून काय बोलणार? राज ठाकरे जर ठाकरे आहेत तर मीसुद्धा संजय राऊत आहे. या राऊतला बाळासाहेबांनी घडवलं आहे, असा पलटवार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांना बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी मला शिकवण्याची गरज नाही. ज्याला जशी भाषा समजते तीच भाषा मी वापरतो, असंही यावेळी राऊत यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे, त्यामुळे त्यांना असं बोलावंच लागेल. ते ज्या ठिकाणी बोलले आहे त्या ठिकाणी गुंडांच्या माध्यमातून विधानसभा लढवली जात आहे. गुंडांना वापरुन जर एकनाथ शिंदे आणि भाजप ही निवडणूक लढवत असतील तर या पुढे जे घडेल त्याची जबाबदारी पोलीसांवर असेल. भाजपच्या नादी लागलेला माणूस अजून दुसर काय बोलेल? असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT