Sanjay Raut Saam Tv
Video

Sanjay Raut: संजय राऊतांच्या घराची रेकी; भास्कर जाधवांनी केला गंभीर आरोप

Sanjay Raut House Reiki: संजय राऊत यांच्या भांडुपमधील घरी रेकी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी याबाबत मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला आहे.

Siddhi Hande

खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी केली असल्याचा मुद्दा आमदार भास्कर जाधव यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला आहे.खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी केली असून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या आमदारांनी केली आहे.

विधानपरिषदेत आमदार भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. संजय राऊतांचा भांडुपमधील घरी ही रेकी झाली आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला आहे. या व्हिडिओत खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर दोन अज्ञात व्यक्ती बाईकवरुन आल्याचे दिसत आहे. ते त्यांच्या घराबाहेर वावरताना दिसत आहे. खासदार संजय राऊतांच्या सुरक्षिततेत वाढ करण्याचीही मागणी केली जात आहे.

खासदार संजय राऊतांच्या घराची आज सकाळी पाहणी करण्यात आली आहे. त्यांच्या हातात मोबाईल होता. दोघे अज्ञात व्यक्तींकडून ही पाहणी करण्यात आली होती. तर या बाईकचा नंबर चेक करण्यात आला तर तो बिहारचा असल्याचे समजले. त्यामुळे संजय राऊतांच्या सुरक्षितते वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

या घटनेनंतर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस स्टेशनला कळवले असता सीसीटीव्ही आणि गाडीचा नंबर चेक नक्की कुठल्या विभागातली आहे हे तपासात आहे सीसीटीव्ही मध्ये पाहिलं असता मागील जो बाइक वर बसला आहे त्याच्याकडे दहा हुन अधिक मोबाईल असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंतराळवीर शूभांशू शुक्ला पृथ्वीवर दाखल

कर्जतच्या हालीवली गावात जादूटोण्याचा थरार, दोघांना पकडले अन्...; नेमकं काय घडलं? VIDEO

Infinix Hot 60 5G+: iQOO आणि Poco यांना टक्कर देणारा नवीन बजेट स्मार्टफोन

Tejashri Pradhan: 'गालावर खळी, डोळ्यात धुंदी' तेजश्री प्रधानचे हे फोटो पाहून पागल व्हाल

सतत फोनवर बोलताना call disconnect होतोय? फॉलो करा हे हॅक्स

SCROLL FOR NEXT