Maharashtra Live News Update: अंतराळवीर शूभांशू शुक्ला पृथ्वीवर दाखल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक १५ जून २०२५, महराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

अंतराळवीर शूभांशू शुक्ला पृथ्वीवर दाखल

अंतराळवीर शूभांशू शुक्ला अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर दाखल. भारतीय आणि समस्त शुक्ला कुटुंबाकडून जंगी स्वागत. भारतीयांसाठी अभिमानाची बाब.

किल्ले रायगडचा पायरी मार्ग बंद; आदेश जारी

किल्ले रायगडचा पायरी मार्ग बंद

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किसन जावळे यांनी काढले आदेश

रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अर्लट असून किल्ले रायगड परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पायरी मार्ग बंदचे आदेश जारी

पुढील आदेश येईपर्यंत पायरी मार्ग बंदीचे आदेश जारी रहाणार

नागपुरात अनधिकृत भोंग्यांवर कारवाई

मुंबईप्रमाणेच उपराजधानी नागपूरमध्येही धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे आणि लाऊडस्पीकरवर कडक कारवाई सुरू आहे. पोलिसांच्या सूचनेनंतर आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक भोंगे आणि लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत.

'मी ब्राह्मण आहे इथे ब्राह्मणांचा जास्त चालत नसलं तरी, उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं चालतं - नितीन गडकरी

'मी ब्राह्मण आहे इथे ब्राह्मणांचा जास्त चालत नसलं तरी, उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं चालतं, असं मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. एका कार्यक्रमात ते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी जात पात मानत नसल्याचं सांगितलं.


'त्या ठिकाणी दुबे मिश्रा पांडे सगळे लठ्ठूबाज आहेत, त्यांचा मोठा दबाव आहे. मी यूपीमध्ये गेलो होतो तेव्हा माझ्याकडे तिथले काही लोक आले आणि म्हणाले की अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर तुम्ही आमचे नेते आहे. मी त्यांना विचारलं का? तर ते म्हणाले तुम्ही ब्राह्मण आहात. मी त्यांना सांगितलं मी जातपात मानत नाही. लोकांना नेहमी म्हणतो जात-पात मानू नका. जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण जात-पात पाहून जात असतो का? बिर्याणी खायला जाताना तेव्हा नाही पहात की ते कोणाचा दुकान आहे. सिनेमा पाहताना आपण दिलीप कुमारचे पाहतो तेव्हा आम्ही कोणाची जात-पात विचारत नाही'; असं नितीन गडकरी म्हणाले.

भोयर बायपासवर रस्त्याच्या मागणीसाठी रास्तारोको

यवतमाळ लगत असलेल्या भोयर येथील नागरिक गेल्या सतरा ते आठरा वर्षापासून ई-क्लासच्या जमीनीवर राहताहेत.अशात वर्धा,यवतमाळ- नांदेड रेल्वे लाईनच्या कामामुळे रस्ता पूर्णपणे बंद केल्याने नागरिकांची यामध्ये गैरसोय होत असल्याने रस्त्याच्या मागणीसह आरोग्य केंद्राची व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी भोयर बायपास वरील पेट्रोलपंपाजवळ गावातील सर्व नागरिकांनी रास्तारोको आंदोलन करून पर्यायी रस्ता आणि आरोग्य केंद्राची व्यवस्था करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.रेल्वे लाईनच्या कामामुळे गावात ये-जा करता येत नाही,त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आला.

महाबळेश्वरातील वेण्णा नदीचे पाणी रस्त्यावर, पाचगणीत सतत पावसाच्या धारा

सततच्या पडणाऱ्या पावसाने महाबळेश्वरातील वेण्णा नदीचे पाणी रस्त्यावर...

महाबळेश्वर - पाचगणी रस्त्यावर आले पाणी...

पावसाचा आणखी जोर वाढला तर रस्त्यावरील वाहतुकीला होणार अडथळा...

गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर पाचगणी परिसरात सतत पावसाच्या धारा सुरू...

खेड शहरात महिलेला दुचाकीसह पाण्यातून सुखरूप बाहेर काढले

खेड परिसरात गेल्या काही तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भाग पाण्याखाली गेले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहरातील मच्छी मार्केटच्या पाठीमागील रस्त्यावर एक महिला तिच्या दुचाकीसह पाण्यात अडकली होती. रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्याने ती महिला अडकली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

याची माहिती मिळताच सरफराज पांगारकर, एजाज खेडेकर, खालील जुईकर आणि अल सफा वेल्फेअर फाउंडेशनचे कार्यकर्ते तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला सुरक्षित रित्या पाण्यातून बाहेर काढून सुखरूप घरी पाठवले.

कोल्हापूरमधील नेते अन् शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूरमधील नेत्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आणि कोल्हापूरमधील भाजप नेते उपस्थित होते. खालील नेत्यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला.

दिलीप पवार (माजी नगरसेवक) -

उत्तम कोरने -

अभिषेक बोंद्रे -

संताजी घोरपडे

प्रसाद धनाजी जाधव

वैभव भोसले

सुशांत गजानन सावंत

अभिजित माने

दीपक राजाराम खांडेकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडार गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. आज कोल्हापूरमधील शेकडो नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा भाजपलसा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे.

डॉ. आशिष पनशेट्टी यांचा भीषण कार अपघातात जागीच मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील तडवळ येथील डॉ. आशिष पनशेट्टी यांचा भीषण कार अपघातात जागीच मृत्यू झालाय. हा अपघात सोलापुराहून तडवळकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला आहे. रात्रीचा सुमारास अपघात झाल्याने रस्तावर गर्दी नसल्याने त्यांना वेळीच वैद्यकीय मदत मिळाली नाही. त्यामुळेडॉक्टरांचा मृतदेह सहा तास गाडीत पडून होता.

राज्यातील धरणसाठा ६० टक्क्यांवर

सध्या राज्यात जलसाठा ५९.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा अवघा २८.२८ टक्के होता.

विदर्भात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमध्ये भरपूर पाणी साठा वाढला असून,पुणे विभागातील धरणसाठा हा ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी मे महिन्यात मॉन्सून पूर्व आणि मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली.मे आणि जून या दोन्ही महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यातील सर्वच धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

राज्यात सर्वाधिक धरणसाठा हा कोकण विभागात ७५.०६ टक्के एवढा झाला आहे.तर पुणे विभागतही पाणीसाठा हा ६९.५६ टक्के एवढा झाला आहे.

सध्या नागपूर,अमरावती विभागात ४७ टक्के तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ४४ टक्के पाणीसाठा आहे. राज्यात गतवर्षीपेक्षा सध्या ३०.८८ टक्के अधिकचा पाणीसाठा उपलब्ध आहे.

Ahilyanagar: अहिल्यानगरच्या केडगाव भागात महिलेवर सामूहिक अत्याचार

अहिल्यानगरच्या केडगाव भागातील दूध सागर सोसायटी परिसरात महिलेवर सामूहिक अत्याचार..

मागील भांडणाच्या कारणावरून एका जणांने केला अत्याचार तर तीन जणांनी केली मारहाण...

मारहाणीत महिला गंभीर जखमी; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल..

Pune: पुण्यात १४ हरणांचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील राजीव गांधी प्राणी पार्क कात्रज येथील हरणांचा मृत्यू

गेल्या ४ ते ५ दिवसात १४ हरणांचा मृत्यूमुळे एकच खळबळ

राजीव गांधी प्राणी उद्यानात सद्यस्थितीत ९८ हरिण यापैकी १४ हरणांचा मृत्यू

नेमका हरणांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही

Mumbai Rain: मुंबई पूर्व उपनगर जोरदार पावसाची हजेरी

उपनगरातील काही सकल भागात चाचले पाणी

मानखुर्द स्टेशन परिसरात साचले पाणी

मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ

Andheri : अंधेरी सबवे गेला पाण्याखाली

अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरी गोरेगाव कांदिवली बोरीवली मालाड परिसरात जोरदार पाऊस

जोरदार पावसामुळे सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात

अंधेरी सबवे तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीसाठी केला बंद

अंधेरी पोलीस आणि सहार व डी एन नगर वाहतूक पोलिसांकडून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सभेतील पाणी पंप द्वारे उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांच निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांचं आज सावंतवाडी येथील निवासस्थानी निधन झालं. विकास सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक, शिखर बँकेचे संचालक तसेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती मात्र ते पराभूत झाले होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Mumbai-Goa: मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी

नागोठणे येथील रेल्वे पुलाखालील रस्ता गेला पाण्याखाली

महामार्गावरून वाट काढताना वाहन चालकांची कसरत

महामार्गाच्या कामाची मोठ्या पावसात पोलखोल

चिखलात झोपत विद्यार्थ्यांचा आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भर पावसामध्ये विद्यार्थ्यांनी वस्तीगृह मिळत नाही यासाठी चिखलामध्ये झोपून आंदोलन केल. सर्व विद्यार्थ्यांना सरसकट वस्तीगृह मिळावे या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांनी हे आंदोलन केल.भर पावसामध्ये हे आंदोलन सुरू होतं तात्काळ गेस्ट व वस्तीगृह शुल्क सुरू करा मुलांचे हॉस्टेल क्रमांक दहा तात्काळ सुरू करा आणि सर्व प्रवेशित विद्यार्थिनींना तात्काळ वस्तीगृह द्या अशी मागणी या आंदोलन विद्यार्थ्यांनी केली. यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.

पुण्यातील ससून रुग्णालयातील इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांचा स्टायपेंड थकित

पुण्यातील बी जे मेडिकल मधील इंटर्नशिप डॉक्टर आले एकत्र

मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांचा गेले तीन महिने स्टायपंड थकित

स्टायपंड न दिल्याने प्रशासनाविरुद्ध एएसएमआय संघटनेचे पत्र देत वेळेत स्टायपंड देण्याची मागणी

Raigad: रायगडच्या महाडमध्ये पुरसदृष्य परिस्थिती

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाबळेश्वर, पोलादपुर परिसरात कोसळणाऱ्या जोरदार पावसाने सावित्री नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. केवळ तीन तासा त तीन मिटर ने पाणी पातळी वाढली असून प्रशासन सतर्क झाले आहे. सावित्री नदीच पाणी लाटां प्रमाणे किनाऱ्यावर आदळत आहे.

Ratnagiri: रत्नागिरी - कोकणामध्ये मुसळधार पाऊस

या पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातल्या कशेडी घाटाला बसतोय..

मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदाजवळ दरड कोसळल्यामुळे तिथली वाहतूक काही काळ ठप्प झाली होती..

पडलेली दरड हटवण्याचे काम स्थानिक प्रशासनातून कडून युद्ध पातळीवर सुरू आहे..

Pune: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट

आज पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून रायगड, रत्नागिरीवरील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ३ तासांत पुणे आणि सातारा येथील घाटांमध्ये वादळांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Koyana: कोयना धरणाचे दरवाजे उघडले

कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फूट 6 इंचाने उघडून 5000 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे

पायथा वीजगृहातून 2100 कयुसेक तर सहा दरवाज्यातून 5000 कयुसेक असा एकूण 7100 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाला आहे

पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस व धरणात येणारे पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे

105 TMC पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 75.48 TMC पाणीसाठा झाला आहे

Raigad: रायगड - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम....

रोहा - नागोठणे मार्गावरील भिसे खिंड येथे दरड कोसळली...

रोहा नागोठणे मार्गावरील वाहतूक ठप्प....

पावसाची संततधार सुरू असल्याने दरड काढण्याच्या कामात व्यत्यय...

भिसे खिंड येथून प्रवास न करण्याचे आवाहन...

Metro: महामुंबई मेट्रोचा वेग वाढला!

३ नवीन ट्रेनसह दररोज ३०५ फेऱ्या

प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करत, मेट्रो मार्ग २(A) आणि ७ वर बुधवारपासून मेट्रो सेवा आणखी वेगवान आणि सुलभ होणार आहे.तीन नवीन ट्रेन सह आता दररोज 305 फेऱ्या चालणार आहेत. ट्रेनच्या फेऱ्यांमधील अंतर ६:३५ ऐवजी ५:५० मिनिटांवर आणण्यात आले आहे.

Samgmeshvar: संगमेश्वर तालुक्यातील माखझन बाजार पेठेत पुराचे पाणी

गड नदीचे पाणी माखजन बाजारपेठेत

पावसाचा जोर वाढला तर पुराच्या पाण्याचा बाजारपेठेला धोका वाढणार

गड नदीच्या लागतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन करण्यात आले आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे हे शोरुम आहे.

रात्रीपासून संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस

संगमेश्वर तालुक्यात 142 मिलिमीटर पावसाची नोंद

तालुक्यातील कसबा, शास्त्री पुल भागाला पावसाने जोरदार झोडपले

शास्रीनदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय पावसाचा जोर असाच राहीला तर पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना नोटीस

- मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पाठवली मानहानीची नोटीस

- मनसे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून दुबे याना नोटीस

- निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेले सगळे व्हिडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी

- मराठी लोकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी उर्दू,तामिळ आणि तेलगू भाषिकांना मारून दाखवण्याचे केले होते दुबे यांनी वक्तव्य

- 7 दिवसात नोटीसला उत्तर न दिल्यास पोलीस तक्रार आणि दावा दाखल होणार

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

दक्षिण रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

० जोरदार पाऊस कोसळत असल्याने रायगड जिल्हाधिकारी यांनी काढली आधिसुचना

० महाड, पोलादपुर, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा येथील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर

Maharashtra Live News Update: नाशिक गुजरात महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद

- सापुतारामार्गे जाणारा नाशिक गुजरात महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद

- डांग जिल्ह्यातील अंबिका नदीवरील पुलाची दुरावस्था झाल्याने हा पूल अवजड वाहतुकीसाठी करण्यात आला बंद

- बडोदरा येथील पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकारकडून गुजरात राज्यातील जुन्या पुलांचे करण्यात आले ऑडिट

- या ऑडिटमध्ये महाराष्ट्र गुजरातला जोडणारा राज्य महामार्गावर 9 वरील हा पूल अवजड वाहतुकीसाठी करण्यात आला बंद

- पुढील एक वर्षासाठी या मार्गावरून अवजड वाहने नेण्यास करण्यात आली बंदी.

- '''नंदी उतरा" म्हणून साकारपातल गावाजवळील हा पूल डांग जिल्ह्यात ओळखला जातो

- सापुतारा रस्त्याऐवजी आता अवजड वाहनांना हातगड सुरगाणामार्गे वासदा हा मार्ग वापरण्याच्या सूचना

विद्यार्थी प्राध्यापकांना बायोमेट्रिकचे बंधन, आज बसून अंमलबजावणी

उच्च महाविद्यालयां मधील अध्यापन गुणवत्ता पूर्ण व्हावे. नियमित सर्व विषयांच्या तासिका व्हाव्यात. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहावी. अशा उद्देशाने विद्यापीठाशी संलग्नित सर्व उच्च महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आज पासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यासंबंधीचा पत्रव्यवहार सर्व विद्यापीठांना केला होता. त्यानुसार आता ही कार्यवाही होणार आहे.

- नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती

- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती

- सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने 26 मे 2025 रोजी न्यायमूर्ती सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती

- न्यायमूर्ती नितीन सांबरे हे नागपूरचे सुपुत्र आहे...त्यांची 6 जानेवारी 2014 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

- डिसेंबर 2023 पासून ते नागपूर खंडपीठात कार्यरत आहेत.

- माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन सांबरे यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती.

दहा तोळे सोने, चांदीसह रोख रक्कमेवर डल्ला

करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या शिक्षक कॉलनीत जबरी चोरी झाल्याचं उघड झाले आहे. घराच्या मुख्य दरवाजाची कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत दोन बेडरूममधील तीन कपाटे कटावणीने फोडून दहा तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख १३ हजार रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला. सोमवारी मध्यरात्री १ च्या दरम्यान ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

यवतमाळच्या महागांव पोलिसात बच्चू कडू सह बारा जणांवर गुन्हे दाखल,नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सातबारा कोरा पदयात्रेची समारोप सभा घेतल्याने तब्बल तीन तास दोन्ही बाजुची वाहतुक झाली होती ठप्प

माजी मंत्री बच्चू कडून सह 12 जणांवर महागाव पोलिसात राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरच सातबारा कोरा पद यात्रेचा समारोपीय सभा घेतल्याने दोन्ही बाजूची वाहतूक झाली होती ठप्प

शाळेसाठी 60 बालकांना करावा लागतो धोकादायक प्रवास....

नंदूरबार जिल्हा ग्रामीण रस्ते विकास योजनेतून अंतर्गत जनतेच्या सोयीसाठी अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडापर्यंत 4 किलोमीटर रस्ता मंजूर झाला, त्यासाठी निधीही दिला. रस्त्याअभावी मोठा तोलवापाड्यातील 3 गरोदर मातांसह 8जणांना प्राण गमवावे लागले. तरीही मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले नाही. परिणामी 60 पेक्षा‌ अधिक शाळा-अंगणवाडीतील मुलांसह जनतेला रतवाई नदीच्या घाटावरुन प्राणघातक मार्ग काढावा लागत आहे. मरणयातनेतून मुक्तीसाठी संबंधित ठेकेदाराने तातडीने काम सुरू करावे अन्यथा रस्त्यावर उतरण्याची संतप्त भावना...

दरोडा टाकण्याआधीच सात जणांना बेड्या

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात दरोडेखोरांना दरोड्याचा प्रयत्न करण्या आधीच अटक करण्यात पालघरच्या मनोर पोलिसांना यश आल आहे . मनोर पोलीस ठाणे हद्दीतील नानिवली येथील प्रसाद विजय पाटील यांच्या राहत्या घरावर या आरोपींनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असून घर मालकांनी आरडाओरड केल्यानंतर या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला . मात्र यावेळी हे सर्व दरोडेखोर घरा शेजारी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाले असून या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अवघ्या काही तासातच या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आल आहे . या प्रकरणात सातही दरोडेखोरांना चारोटी येथील एका हॉटेल वरून अटक करण्यात आल असून त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणार साहित्य तसच मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत . हे दरोडेखोर डहाणूच्या कासा सह परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे .

पुणे-दिल्ली विमानात उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे दिसताच वैमानिकाने प्रसंगावधान दाखवून धावपट्टीवरूनच विमान माघारी वळविल्याची घटना रविवारी घडली. तांत्रिक दुरुस्ती केल्यांतर पाच मिनिटांनी विमानाने दिल्लीकडे उड्डाण घेतले . गोदरच या विमानाला उड्डाणाला पाच तास उशीर झाला होता

कोयना धरण 75 टीएमसी भरले, आज सहा वक्र दरवाजे उघडणार

कोयना धरण परिसरात पडत असल्या पावसामुळे आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांनी उघडण्यात येणार आहेत. कोयना धरणातून नदीपात्रात 7 हजार 100 क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात येणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणात सध्या 75 टीएमसी पाणीसाठा साठला आहे.

 सुनील तटकरे यांनी रायगडच्या आरोग्‍य विभागाच्‍या कारभारावर व्यक्त केली नाराजी

कामात हलगर्जी केल्‍याप्रकरणी रायगडचे जिल्‍हा शल्‍यचिकीत्‍सक डॉ. निशिकांत पाटील यांच्‍या विरोधात लोकसभा अध्‍यक्षांकडे हक्‍कभंग आणणार असल्‍याचा इशारा खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे. जिल्‍हास्‍तरीय दिशा समितीच्‍या बैठकीत सुनील तटकरे यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर तोफ डागली. यापुढे कामात कुठलीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही असे स्‍पष्‍ट संकेतही त्‍यांनी रायगडच्या आरोग्य विभागाला दिले. जिल्‍ह्यातील नागरीकांच्‍या आरोग्‍य यंत्रणेबाबत अनेक तक्रारी आहेत. दिव्यांग बांधवांसाठी जिल्‍ह्यात शिबिरे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या सुचनांचे पालन केले गेले नाही त्‍यावरून खा. सुनील तटकरे चांगलेच संतापले होते.

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गावरून गांजाची तस्करी, नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

- समृद्धी महामार्गावरून तब्बल १२१ किलो गांजाची होणारी तस्करी रोखली

- २४ लाख २८ हजारांचा गांजा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पकडला

- नागपूरहून मुंबईकडे गांजाची तस्करी होणार असल्याची नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती गोपनीय माहिती

- सिनेस्टाईल पाठलाग करत केली कारवाई; एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

- एकूण तीन संशयितांना करण्यात आली अटक तर एक संशयित झाला फरार

- फरार झालेला संशयित नाशिकच्या टिप्पर गँगचा अट्टल गुन्हेगार

- फरार संशयित सुनील अनार्थे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे अकरा गुन्हे आहे दाखल

- अनेक जिल्ह्यांना जोडणारा समृध्दी महामार्ग हा गुन्हेगारांसाठी देखील बनला समृद्ध करणारा

- काही दिवसांपूर्वी समृध्दी महामार्गावरून गोमासाची देखील झाली होती तस्करी

36 पैकी 30 मोठ्या पुलांचे बांधकाम पूर्ण

- विदर्भ आणि मराठवाड्याला जोडत अर्थव्यवस्थेला मजबूत करणारा प्रकल्प म्हणून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाकडे पाहल जाते.

- बिनोडा ते कारली दरम्यान प्रस्तावित असलेला 2900 मीटर लांबीच्या बोगद्याचा काम प्रगती पथावर असून १३०० मीटर ड्रिलिंग पूर्ण झाल आहे.

- या रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता या कामाला गती आलेली आहे. 36 पैकी 30 मोठ्या पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर 3 पुलांचं अंतिम टप्प्यात असून 3 पुलं हे प्रगतीपथावर आहे.

- तेच 14 छोट्या मुलांपैकी 3 पूर्ण झाले. 2 पुलाचा कामाची प्रक्रिया सुरू आहे. 9 पुलांचे काम लवकर सुरू होणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे.

- कळंब यवतमाळ दरम्यान एकूण भूसंपादनाचे 80% काम पूर्ण झाले आहे. तर तळेगाव रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले असून प्लॅटफॉर्म चे काम प्रगतीपथावर आहे.

- दहा रोडवरओव्हर ब्रिजपैकी बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. तर एका आरोबीसाठी विभागाची परवानगीची प्रतिक्षित आहे.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री कार्यालयात विदर्भ गुंतवणूक सल्लागारपदी शिवानी दाणी यांची नियुक्ती

- मुख्यमंत्री कार्यालयाने गुंतवणुकीच्या प्रवाहाला गती देण्यासाठी केलेला महत्त्वपूर्ण फेरबदलात शिवानी दाणी यांची विदर्भासाठी गुंतवणूक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारत @ अमृतकाल या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रादेशिक नेतृत्व तयार करून विद्यमान आणि संभाव्य गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचे उद्दिष्ट

- विदर्भ एक प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे. दावोस नंतर विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा ओघ वाढला

- विदर्भातील गुंतवणुकीची संधी ओळखणे आणि क्षेत्राच्या प्रचार करणे एमआयडीसी आणि मिहान इतर संबंधित संस्था हितधारकांचा समन्वय साधने ही जबाबदारी शिवानी दाणींवर असणार आहे

डमधील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कोका कोला कंपनी विरोधात निषेध मोर्चा

खेडमधील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कोका कोला कंपनी विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. ग्रामस्थांच्या मागण्यांना कंपनी प्रशासनानं केराची टोपली दाखवली स्थानिकांना रोजगार देण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं होतं मात्र ही मागणी देखील कंपनीनं पुर्ण केली नाही.

त्यामुळे स्थानिकांचा जनआक्रोश पहायला मिळाला.संतप्त नागरीकांनी थेट कंपनीवर धडक मोर्चा काढला.यामध्ये महीलांची उपस्थिती मोठी होती. यापुर्वी देखील कंपनीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला मात्र मोर्चात सहभागी झालेल्या जवळपास 450 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते

आंतरराज्य घरफोडी, चोरी प्रकरणातील दोन सराईत आरोपींना बेंगलोर येथून अटक

आंतरराज्य घरफोडी व चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना कर्नाटकातील बेंगलोर येथून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला शिताफीने जेरबंद करण्यात यश आले आहे. या घरफोडी आणि मोटरसायकल चोरी प्रकरणातील अजूनही काही आरोपींचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शंकर मधुकर पवार उर्फ (हडया) आणि राजू मधुकर पवार उर्फ (उड्या ) या दोघांचीही पोलीस कसून चौकशी करत असून उर्वरीत फासेपारधी आंतरराज्य टोळी पकडण्यात दिशा मिळेल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी दिली आहे.

नागपूरमध्ये लहान नाल्यांची सफाई करणार ‘स्पायडर मशीन

- शहरातील लहान नाल्यांची सफाई करणार ‘स्पायडर मशीन’, नागपुरात 9 जुलैला अनके भागात पावसाचं पाणी घरात शिरल्यावर आली जाग...

- बाबा फरीदनगर आणि शक्ती नाल्यातील सफाईच्या चाचणीची आयुक्तांनी केली पाहणी,

- लहान नाल्याची सफाई करण्यासाठी ‘स्पायडर मशीन’ उपयोगात आणली जाणार,

- नाल्यात जास्त पाणी असताना देखील स्वच्छता करता यावी यासाठी ‘स्पायडर मशीन’ला चार पायाची व्यवस्था त्याद्वारे मशीन खोल पाण्यात उभी राहू शकते. तसेच त्यामुळे लहान नाल्यात जाऊन स्वच्छतेचे कार्य करता येते.

- स्पायडर मशीन ३६० अंशामध्ये पूर्ण गोल फिरू शकत असल्यामुळे चारही दिशेने फिरवता येते. विशेष म्हणजे अशी सुविधा इतर मशीनमध्ये उपलब्ध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com