Infinix Hot 60 5G+: iQOO आणि Poco यांना टक्कर देणारा नवीन बजेट स्मार्टफोन

Dhanshri Shintre

स्मार्टफोन

इन्फिनिक्सने आपल्या बजेट ‘हॉट’ सिरीजअंतर्गत नवीन Infinix Hot 60 5G+ स्मार्टफोन ग्राहकांसाठी आकर्षक फीचर्ससह बाजारात सादर केला आहे.

वन टॅप AI बटण

१०,००० रुपयांच्या बजेटमध्ये आलेल्या या 5G स्मार्टफोनमध्ये वन टॅप AI बटण, ऑफलाइन कॉलिंग आणि AI Circle to Search यासारखी फीचर्स आहेत.

Infinix

जर तुम्ही कमी बजेटमध्ये नवीन 5G+ स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल, तर Infinix चा हा नवीन फोन उत्तम पर्याय ठरू शकतो.

किंमत

Infinix ने या स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट सादर केला असून त्याची किंमत 10,499 रुपये ठेवण्यात आली आहे, जो बजेटमध्ये येतो.

स्टोरेज

१०,४९९ रुपयांच्या किमतीत तुम्हाला ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला हा दमदार Infinix स्मार्टफोन मिळू शकतो.

Flipkart

तीन रंगांत सादर झालेला Infinix Hot 60 5G+ स्मार्टफोन १७ जुलैपासून Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

रेंज

या किमतीच्या रेंजमध्ये Infinix Hot 60 5G+ ची स्पर्धा Lava Storm Play, iQOO Z10 Lite आणि Poco M7 यांच्यासोबत होणार आहे.

डिस्प्ले

या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेटसह आणि स्पष्ट व्हिज्युअल अनुभव प्रदान करतो.

परफॉर्मन्स

Infinix Hot 60 5G Plus स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7020 हा शक्तिशाली प्रोसेसर देण्यात आला असून तो जलद आणि प्रभावी परफॉर्मन्स सुनिश्चित करतो.

फ्रंट कॅमेरा

फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असून ड्युअल मोड व्हिडिओ रेकॉर्डिंगला समर्थन करतो, तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

NEXT: सॅमसंग, गुगलनंतर आता अ‍ॅपलचा डाव! पहिला फोल्डेबल iPhone लवकरच बाजारात येणार

येथे क्लिक करा