MNS activists protesting against potholes in Kalyan-Dombivli with traditional drums. Saam Tv
Video

KDMC- कल्याण-डोंबिवलीत मनसेचा अनोखंं आंदोलन, खड्ड्यांविरोधात ढोल-ताशांचा गजर|VIDEO

Unique Agitation By MNS: कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसेचं अनोखं टाळ-मृदुंग घेऊन आंदोलन पार पडले.

Omkar Sonawane

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढते आहे.

मनसेने टाळ-मृदुंगासह पारंपरिक आंदोलन केलं.

नागरिकांनी आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिला.

रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी मनसेने केली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडिएमसी) हद्दीत वाढत चाललेले रस्त्यांचे खड्डे आणि त्यातून होणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे मनसे आक्रमक झाली आहे. आज मनसे कार्यकर्त्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला. या आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी केडिएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असूनही प्रशासन आणि निवडून आलेले सत्ताधारी लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपघातांची संख्या वाढत असून जीवितहानीची शक्यता कायम आहे. त्यामुळे तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी मनसेने केली आहे.

संपूर्ण आंदोलन पारंपरिक टाळ-मृदुंगाच्या गजरात पार पडले. त्यामुळे या आंदोलनाला वेगळेच आकर्षण लाभले असून नागरिकांनीही आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिला. मनसेच्या या अनोख्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

Silent Divorce: सायलेंट डिव्होर्स म्हणजे काय? घटस्फोटाआधीच तुटतं नातं; सायलेंट डिव्होर्सचे संकेत कोणते?

Maharashtra Politics: प्रभागरचनेत कुणाचा फायदा, कुणाचा तोटा?, भाजप-शिंदेंकडून दादांची कोंडी?

गर्लफ्रेंडला हॉटेलला बोलावलं, शरीरसंबंधांनंतर विवाहित पुरुषाचा मृत्यू; रुममध्ये विपरित घडलं

Dwarka Utsav : बैलांना रथात ठेवून शेतकऱ्यानं स्वतःला रथाला जुंपलं; काय आहे अकोल्यातील ३०० वर्षांची परंपरा ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT