MNS leader Avinash Jadhav shares details of the Mira Road incident during his interview with Saam TV. saam tv
Video

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदर मोर्चा का निघाला? अविनाश जाधव यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला | VIDEO

Full explanation By Avinash Jadhav: मीरा रोडमध्ये अमराठी मिठाई दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेनंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मनसे आणि शिवसेनेने मोर्चा काढला.

Omkar Sonawane

हिंदीसक्तीच्या निर्णयानंतर राज्यात मराठीवरून राजकीय रणकंदन पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मीरा भाईंदर येथील एका अमराठी मिठाई दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला दणका देत मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. यानंतर मराठीच्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून याचेच उत्तर म्हणून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने तिथे मोर्चा काढला.

मात्र, हा मोर्चा का काढण्यात आला? अमराठी दुकानदाराला का मारले गेले? या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज ‘साम टीव्हीच्या’ ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात मुलाखत दिली.

या मुलाखतीत, मीरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मिठाईवाल्याला का मारले? या प्रश्नावर उत्तर देताना अविनाश जाधव म्हणाले,

हिंदीसक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते जल्लोष करत होते. त्यांनी त्या मिठाईच्या दुकानातून मिठाई घेतली. तेव्हा त्या दुकानदाराने विचारले, ‘आप लोग क्यों सेलिब्रेशन कर रहे हैं?’ यावर आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला गेला आहे. त्यावर तो दुकानदार म्हणाला, ‘यहां पे तो हिंदी ही चलती है।’ यावरून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला.

त्या दुकानदाराने आणखी काही लोकांना बोलावले. मग आमचे कार्यकर्ते त्याला विचारू लागले की, ‘महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते?’ यावर तो अत्यंत मुजोरपणे म्हणाला, ‘यहां पे सब भाषाएं बोली जाती हैं।’ त्यामुळे आमचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी त्याला चोप दिला."असे अविनाश जाधव यांनी या संपूर्ण घटनेचे स्पष्टीकरण दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

गरोदरपणात महिलांचं किती वजन वाढणं नॉर्मल?

Jalebi Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? मग झटपट घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी जलेबी, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: कार्यालयात शिरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न, CCTV Video व्हायरल

SCROLL FOR NEXT