Minister Shambhuraj Desai addressing media about the Satara woman doctor suicide case. Saam Tv
Video

Satara News: डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक होणार? मंत्री शंभुराज देसाईंनी दिली महत्वाची माहिती|VIDEO

Shambhuraj Desai Statement On Satara Woman Doctor Case: सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मंत्री शंभुराज देसाई यांनी स्वतः लक्ष घातले असून आरोपी पोलिसांवर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहेत.

Omkar Sonawane

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणी मंत्री शंभुराज देसाई यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. 'कोणी अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, आम्ही या प्रकरणाच्या खोलात जाऊन कठोर कारवाई करू,' असा स्पष्ट इशारा शंभुराज देसाई यांनी दिला आहे. पीडित डॉक्टरने तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

देसाई यांनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना स्वतः घटनास्थळी जाऊन तपास करण्याचे आणि सर्व पुरावे गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. एका सुशिक्षित डॉक्टर महिलेसोबत पोलीस अधिकाऱ्याकडूनच असे कृत्य घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच महिला डॉक्टरच्या नातेवाईकांना कोणावर संशय असेल तर त्यांनी सांगावे त्यांची देखील चौकशी केली जाईल आणि महिला पोलिस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की त्यांना विश्वासात घ्यावे. ज्या पोलिस अधिकाऱ्यांचे नावे यामध्ये आहे त्यांना शोधण्यासाठी 5 पथक रवाना करण्यात आली आहे अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection : 'थामा'च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण; 'एक दीवाने की दीवानियत'नं किती कमावले? वाचा कलेक्शन

हातपाय बांधले अन् गरम चटके; अनैतिक संबंधातून नांदेडच्या तरूणाची कर्नाटकात हत्या

EPFOचा मोठा निर्णय! पेन्शनच्या ५ नियमांत केले बदल; थेट खिशावर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Phaltan Doctor death : फार्महाऊसवरून बनकरच्या मुसक्या आवळल्या, प्रमुख आरोपी PSI बदने फरारच

SCROLL FOR NEXT