Valmik Karad aide Gotya Gite MCOCA latest news Saam TV marathi News
Video

Beed Crime : वाल्मिक कराडच्या राईट हँडला मोठा दिलासा, पोलिसांकडून मकोका रद्द

बीड पोलिसांनी लावलेला मकोका सातपैकी पाच आरोपींवर रद्द करण्यात आला आहे. यात वाल्मीक कराडचा राईट हँड गोट्या गीतेचाही समावेश आहे. तर रघुनाथ फड आणि धनराज गीते यांच्यावर मकोका कायम ठेवण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Walmik Karad aide Gotya Gite MCOCA latest news : परळीतील सहदेव सातभाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणात बीड पोलिसांनी रघु फड गॅंगवर मकोकांतर्गत कारवाई केली होती. या गँगचे वाल्मीक कराड समर्थकांशी संबंध असल्याचे उघड झाले होते. या टोळीत सात जणांचा समावेश असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र आता अपर पोलिस महासंचालकांनी सातपैकी पाच आरोपींवरील मकोका रद्द केला आहे. यात वाल्मीक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गितेचाही समावेश आहे. नंदागौळ (ता. परळी) येथील रहिवासी असलेल्या गोट्या गितेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे १० ते १५ गंभीर गुन्हे नोंद असून तो अद्याप फरार आहे. गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गिते या पाच जणांवरील मकोका रद्द झाला आहे. तर टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि धनराज गिते या दोघांवरच मकोका कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे परळी परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Metro Trial : ठाणेकरांचे स्वप्न सत्यात उतरले, सोमवारी मेट्रो धावणार, या दिवशी होणार उद्घाटन

Madhuri Dixit : क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो, 'धकधक गर्ल' चं पाहा लेटेस्ट PHOTOS

KDMC News : २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, शेकडो नागरिक आक्रमक

Maharashtra Live News Update: - गोपीचंद पडळकरांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून पडळकर समर्थकांनी केले प्रति-आंदोलन

Sleep Care: रोज अपूरी झोप? मेंदूवर होईल गंभीर परिणाम, वेळीच 'हे' परिणाम ओळखा

SCROLL FOR NEXT