Matheran horses showing signs of eye swelling and vision problems amid mysterious disease outbreak. Saam Tv
Video

Matheran Horses: माथेरानमधील घोड्यांना विचित्र आजाराची लागण|VIDEO

Unknown Eye Illness Hits Horses: माथेरानमध्ये घोड्यांना अज्ञात डोळ्याचा आजार लागल्याने दृष्टी कमी होत आहे. शासनाच्या पशुवैद्यक विभागाकडून योग्य उपचार न मिळाल्यामुळे अश्वपालक चिंतेत सापडले आहेत.

Omkar Sonawane

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये घोड्यांना डोळ्याच्या अज्ञात आजाराची लागण झाली आहे. गेल्या विस दिवसांपासून उद्भवलेल्या या आजारामध्ये घोड्यांना दृष्टी दोष निर्माण होत आहे. प्रथम डोळ्यांना सुज, डोळ्यांच्या रंगात बदल आणि दृष्टी कमी होत जाण्याची लक्षण दिसत आहेत. हा आजार नक्की काय आहे हे अद्याप समजले नसुन या आजाराची 11 घोड्यांना लागण झाली आहे.

घोडा हा माथेरानकरांसाठी केवळ एक प्राणी नसून तो त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य, उत्पन्नाचे साधन आहे. घोड्यांना अज्ञात आजाराची लागण झाली आहे. मात्र, शासनाच्या पशू वैद्यकिय विभागाकडून योग्य उपचार मिळत नसल्याने येथील अश्वपालक खाजगी डॉक्टरद्वारे उपचार करून घेत आहेत. यामुळे येथील पशु वैद्यकिय विभागावर नाराजी व्यक्त होत असून शासनाने हा आजार कोणता आहे, आजाराचे कारण काय आहे हे शोधुन योग्य उपचार करावेत अशी मागणी अश्वपालकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : सोलापूर, साताऱ्यात पावसाचा जोरदार तडाखा; शेतांमध्ये गुडघाभर पाणी, पिकांचे नुकसान

Heart disease symptoms: हृदयाच्या गंभीर समस्या असल्यास पायांमध्ये दिसतात 'हे' तीन बदल; हार्ट अटॅक येण्यापूर्वी उपचार घ्या

Maharashtra Live News Update: पैठण तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसऱ्या मेळाव्याचा टीझर प्रदर्शित, ठाकरे बंधूंची युतीची शक्यता|VIDEO

Facebook : १ लाख व्ह्यूजमागे फेसबुक किती पैसे देतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT