Marathwada Rain saam TV Marathi News
Video

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, १० जणांचा बळी, ३३७ जनावरे दगावली

Marathwada heavy rain update मराठवाड्यात अतिवृष्टीचा तडाखा कायम असून गेल्या २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. ३३७ जनावरे दगावली आहेत तर २ लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Namdeo Kumbhar

Death toll rises in Marathwada floods : मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत नांदेड वगळता अन्य सातही जिल्ह्यांतील 129 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 57 मंडलांत अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी पूर आला आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत पुरामध्ये अडकलेल्या 80 हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आलं. नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून, 337 जनावरे दगावले. गेल्या 3 दिवसांत 2 लाख हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे मराठवाड्यात ओल्या दुष्काळाची स्थिती आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला आठवाभरापासून पावसाने झोडपले आहे. यावर्षी अनेक वर्षांचा विक्रम पावसाने मोडीत काढला आहे. सतत सुरू असलेल्या संततधारेमुळे कन्नड वैजापूर सिल्लोड सोयगाव गंगापूर खुलताबाद या तालुक्यातील अनेक शिवार पाण्यात आहेत. खुलताबाद तालुक्यातील वेरूळसह परिसरातील कसाबखेडा, मंबापुर, पळसवाडी, तलाववाडी, शादुलवाडी, शेकापुरी, तिसगाव, निरगुडी, पिंपरी, पळसगाव, आखातवाडा येथील पिके धोक्यात आले आहेत. मक्का, सोयाबीन, कापूस, आदी पिकांनी माना टाकल्या आहेत. पाने पिवळी पडत असून करपा, अळी रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर वाढला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात नवा भूकंप! माणिकराव कोकाटेंच्या घरात भाजपचा झेंडा, लहान भावाकडून ठाकरेंना राम-राम

Crime: शाळा सुटल्यावर एकटीला गाठायचा, सोबत नेऊन...; ३ वर्षांच्या चिमुकलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार

HSC, SSC Exam : आता ३५% नव्हे तर ३३ टक्के काठावर पास, दहावी-बारावीच्या मुलांसाठी कुणी घेतला निर्णय?

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Pune : दौंडजवळच्या कला केंद्रात पुन्हा राडा, मनोरंजनासाठी आलेल्या दोन गटात कोयत्याने हाणामारी

SCROLL FOR NEXT