OBC community protests in Nanded against Maratha reservation demand, warning Maharashtra government of unrest. Saam Tv
Video

Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी बांधव आक्रमक पाहा VIDEO

Growing Rift: मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाच्या विरोधात ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. नांदेड येथे ओबीसी समाजाने घोषणाबाजी करत सरकारला इशारा दिला की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास महाराष्ट्रात मोठा उद्रेक होईल.

Omkar Sonawane

आझाद मैदानावर मराठा समाजाचं आंदोलन सुरू असतानाच ओबीसी बांधव आक्रमक झाले.

नांदेडच्या हदगाव येथे ओबीसी समाजाने तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.

ओबीसी समाजाने सरकारला इशारा दिला की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास उद्रेक होईल.

मनोज जरांगे यांच्या मागणीला ओबीसी बांधवांचा तीव्र विरोध.

मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा बांधव लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात आता ओबीसी बांधव देखील आक्रमक झाले आहेत. नांदेडच्या हदगाव येथे ओबीसी बांधवांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली. हदगाव तहसील मार्फत राज्य शासनाला ओबीसीच्या मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं. मराठा समाजाला विविध माध्यमातून आरक्षण देण्यात आलं आहे. परंतु झुंडशाहीच्या जोरावर ओबीसीमधूनच आरक्षण मिळवण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा हट्टाहस सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारने निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल, असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छगन भुजबळांचा कौतुकास्पद निर्णय, शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा, २८७ आमदारांनी घ्यावा आदर्श

Parbhani Heavy Rain : परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार; शेताला आले नदीचे स्वरूप, होत्याचं नव्हतं झाले

Korigad Fort History: ट्रेकिंग, निसर्ग आणि युद्धनीती; कोरीगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

Kalyan Crime : नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, 'त्या' व्हिडीओमुळे ८ जणांच्या काळ्या कृत्याचा भंडाफोड

SCROLL FOR NEXT