Manoj Jarande Patil Saam Tv
Video

Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईत पुन्हा उपोषणाला बसणार? सरकारला दिला इशारा

Manoj Jarande Patil On Strike: हैदराबाद गॅझेटनुसार जर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर पुन्हा उपोषणाला बसू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुंबईमध्ये जून महिन्यात उपोषण करावे लागेल असे म्हणाले.

Priya More

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार जर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर मला जून महिन्यात नाईलाजाने उपोषणाला बसावं लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालनामध्ये माध्यमांसी संवाद साधताना सांगितले की, 'कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सरकारने समिती गठित केली आहे. सरकारने गोरगरिबांच्या भावनांशी खेळलं नाही पाहिजे. फडणवीसांनी मोठ्या मनाने जीआर काढला, शिंदेसाहेबांचा पण पाठिंबा मिळाला. मग आडवणूक का करायची. विखे पाटलांवरती समाजाने कधी न टाकलेला विश्वास टाकला आहे. शिंदेसाहेबांनी शोधलेल्या नोंदीचे प्रमाणपत्र दिले जात नाही. सरकारपेक्षा अधिकारी मोठे झाले का? जाणून-बुजून सरकार मराठा समाजाची पिळवणूक करत आहे. या पुढच्या काळात त्यांनी असं करू नये. नाही तर जून महिन्यात मला उपोषणाला बसावं लागेल. कारण जून महिन्यात मुलांचे ऍडमिशन असतात. सरकार जर विनाकारण वाटोळ करणार असेल तर मी ऐकणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

बहीण भावाच्या नात्याला काळिमा! वारंवार अत्याचार केल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

SCROLL FOR NEXT