Saam Tv
आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या साजरी करून दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरूवात होते. श्रावणात देवांची आराधना करून उपवास करण्याचे दिवस असतात. मांसाहार टाळून सात्विक आहाराला महत्त्व दिले जाते.
श्रावणात श्रावणी सोमवार,जन्माष्टमी आणि अनेक सण येतात. त्यामुळे उपवास करून शरीर थकून जाते. पण हे पदार्थ खाल्लात तर दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहील.
राजगिरा उपवासात आवर्जुन खाल्ला जातो. राजगिरा पीठाची भाकरी किंवा थालीपीठ बनवून खाऊ शकता. त्यामुळे पोटही भरेल आणि प्रथिने, खनिजे देखील मिळतील.
उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात हा पदार्थ केला जातो . खिचडी खावून कंटाळा आला असेल तर साबुदाणा वडे, थालीपीठ, साबुदाण्याची खीर खाऊन दिवसभर एनर्जेटिक राहू शकता.
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि भरपूर प्रमाणात फॅट्स असते. त्यामुळे उपवासाच्या वेळी शरीराला शेंगदाणे एनर्जी पुरवतात.
उपवासात डिहायड्रेशन होऊ नयेत म्हणून नारळपाणी आणि लिंबू पाणी हा उत्तम पर्याय आहे. यामुळे त्वरित एनर्जी मिळते.
दही, लस्सी, खीर, रबडी, फ्रूट मिल्कशेक यांसारखे दूधापासून तयार झालेले पदार्थ खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रथिने, कॅल्शियम, आणि व्हिटॅमिन्स मिळतात. त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
केळी, सफरचंद, पेरू, पपई, यांसारखी ताजी फळे खावी. फळांमधील नैसर्गिक गोडवा आणि साखरेमुळे थकवा नाहीसा होतो .
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.