Maratha leader Manoj Jarange addressing rally in Beed, targeting Fadnavis over DJ ban and reservation issue. Saam Tv
Video

Manoj Jarange: फडणवीसांचं ऐकून लोकांना त्रास देणं थांबवा; मराठ्यांना डिवचू नका – मनोज जरांगे संतापले|VIDEO

Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी बीड सभेतून फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. डीजे बंदी, पोलिसांची कारवाई आणि मराठा समाजाच्या मागण्यांवरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Omkar Sonawane

बीड सभेतून मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली.

डीजे बंदीवरून मराठा समाजाला जाणूनबुजून उचकवलं जात असल्याचा आरोप.

29 ऑगस्टला लाखोंच्या संख्येने मुंबईत आंदोलन होणार.

“माझ्या जातीला कोणी डिवचले तर मी सोडणार नाही” – जरांगे यांचा इशारा.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. येत्या 29 ऑगस्टला आंदोलणासाठी ते लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार आहे. याआधी जरांगे यांच्याकडून बीडमध्ये सभा घेण्यात आली. या सभेला संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच मराठ्यांच्या पोरांना डिवचले तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांनी आम्हाला डीजे वाजवू दिला नाही. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, सत्ता येत जात असते. मी फार खुनशी आहे. एखादा माझ्या डोक्यात बसला की त्याचा बाजारच उठवून टाकत असतो. आता बीड जिल्ह्यात दुसऱ्या कोणाचा डीजे वाजू द्या मग सांगतो, असा इशाराही मनोज जरांगे यांनी पोलिसांना दिला.

माझ्या जातीला कोणी बिनकामाचं टोकलं तर मी सोडत नाही. फडणवीस डीवायएसपी यांना चिल्लर चाळे करायला लावत आहेत. माझी जात शांततेत मागणी करत आहे. तुम्ही माझ्या जातीला डिवचत आहे. डीजे हा मराठ्यांना छेडण्याचा विषय आहे का? फडणवीस यांचे ऐकून बीडमध्ये दंगल घडवण्याचा विचार होता का? असा गंभीर प्रश्नही मनोज जरांगे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

SCROLL FOR NEXT