Manoj Jarange Patil hunger strike announcement Saam TV
Video

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, येत्या 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसणार, पाहा VIDEO

Manoj Jarange Patil hunger strike announcement : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी आमरण उपोषणाला बसणार, असं जरांगे यांनी सांगितलं आहे.

Satish Daud

Manoj jarange Patil Latest News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी आमरण उपोषणाला बसणार, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. जालना येथे माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. यापूर्वी मनोज जरांगे यांनी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार, असा इशारा दिला होता.

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार, असं जरांगे यांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केलं आहे. सगेसोयरे अधिसूचना काढून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून यासाठी ते आंदोलन करीत आहेत.

राज्य सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची ताकद दाखवणार, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना मराठ्याचे आमदार हाताखाली धरून आंदोलन बंद करायचं आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला आहे. जो कुणी मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला निवडणुकीत धडा शिकवू, असंही जरांगेंनी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

Snake Bite: साप चावल्यावर लगेच काय करावे?

SCROLL FOR NEXT