उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला.
निवडणूक आयोगाने नवीन उपराष्ट्रपतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.
लोकसभा व राज्यसभेचे सदस्य गुप्त मतदान पद्धतीने मतदान करतात.
ही निवडणूक भारतातील १७ वी उपराष्ट्रपती निवडणूक ठरणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ७४ वर्षीय धनखड यांची कार्यकालाची मुदत २०२७ पर्यंत होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेचे सभापती म्हणूनही उपराष्ट्रपती काम पाहत असल्याने सद्यस्थितीत या पदावर नियुक्ती कोणाची होणार, यावर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ केला आहे. भारतीय संविधानात राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास ६ महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याची तरतूद आहे; मात्र उपराष्ट्रपतीपदासाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची अपेक्षा असते.
या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य मतदार असतात. प्रत्येक खासदाराला समान मतमूल्य असते आणि पसंतीक्रम पद्धतीने गुप्त मतदानाद्वारे ही निवडणूक पार पडते. सध्या लोकसभेत ५४२ आणि राज्यसभेत २४० सदस्य आहेत, म्हणजे ७८२ मतदार. निवडून येण्यासाठी किमान ३९२ मतांची आवश्यकता आहे.
भाजपचे दोन्ही सभागृहांतील एकूण खासदार ३३९ आहेत. स्वबळावर बहुमत नसले तरी, मित्रपक्षांच्या पाठिंब्यामुळे एनडीएचे संख्याबळ ४२५ पर्यंत पोहोचले असून त्यांचा उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. धनखड यांचा राजीनामा ही उपराष्ट्रपतीपदासाठी होणारी १७ वी निवडणूक ठरणार आहे. याआधी केवळ तीन उपराष्ट्रपतींनी पदावरील कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राजीनामा दिला होता. त्यामुळे येणारे काही आठवडे देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च संवैधानिक पदासाठी निर्णायक ठरणार आहेत.
उपराष्ट्रपतीपदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्यच मतदार असतात. राज्यसभेच्या नामनियुक्त सदस्यांनाही मताधिकार असतो. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराच्या मताचे राज्यनिहाय मूल्य ठरते; त्याउलट उपराष्ट्रपतीपदासाठी प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य एक इतकेच असते. उपराष्ट्रपतीपदासाठी जेवढे उमेदवार रिंगणात तेवढ्या पसंतीची मते खासदारांना देता येतात. उदा, सात उमेदवार रिंगणात असल्यास खासदारांना १,२,३ अशा क्रमाने सात पसंतीक्रमाने मते (मतपत्रिकांवर, गुप्त मतदानाने) देता येतात. या पसंतीक्रम मतदान पद्धतीत, एकूण वैध मतांच्या आधारे पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित केला जातो. तेवढी मते पहिल्या फेरीत मिळविणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. समजा पहिल्या फेरीत तेवढी मते मिळाली नाहीत तर दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. सर्व मते मोजूनही मतांचा कोटा पूर्ण न केल्यास सर्वाधिक मते मिळवणारा विजयी म्हणून जाहीर केला जातो.
उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा का दिला?
त्यांनी वैद्यकीय कारणास्तव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राजीनामा दिला.
आता नवीन उपराष्ट्रपतीची निवड कशी होणार?
निवडणूक आयोग उपराष्ट्रपतीसाठी लोकसभा व राज्यसभा खासदारांच्या गुप्त मतांनी पसंतीक्रम पद्धतीने निवडणूक घेतो.
आता नवीन उपराष्ट्रपतीची निवड कशी होणार?
निवडणूक आयोग उपराष्ट्रपतीसाठी लोकसभा व राज्यसभा खासदारांच्या गुप्त मतांनी पसंतीक्रम पद्धतीने निवडणूक घेतो.
जगदीप धनखड यांची मुदत किती होती?
त्यांची मुदत ऑगस्ट २०२७ पर्यंत होती. मात्र नव्या उपराष्ट्रपतीसाठी ही मुदत २०३० पर्यंत राहील.
त्यांची मुदत ऑगस्ट २०२७ पर्यंत होती. मात्र नव्या उपराष्ट्रपतीसाठी ही मुदत २०३० पर्यंत राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.