When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Tests to avoid heart attack risk: भारतात हृदयविकारामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक मोठा वाटा हृदयविकाराच्या झटक्यांचा आहे. अशा गंभीर धोक्यांपासून वाचण्यासाठी, वेळीच आवश्यक वैद्यकीय तपासण्या करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
When to do heart checkup
When to do heart checkupsaam tv
Published On
Summary
  • हार्ट अटॅक हा भारतातील मृत्यूचा एक प्रमुख कारण आहे.

  • 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळे होत असल्याची आकडेवारी आहे.

  • 40 वर्षांनंतर नियमित हृदय तपासणी अत्यावश्यक आहे.

आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत हार्ट अटॅक हे मृत्यूचं सर्वात मोठं कारण बनताना दिसतंय. आपल्या देशातही ही स्थिती चिंताजनक होताना दिसतेय. जीवनशैलीत बदल आणि वेळेवर हृदयाची तपासणी हे या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. विशेषतः 40 ते 45 वयाच्या पुढील व्यक्तींनी नियमित हृदय तपासणी करावी असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

हृदय तपासणी किती वेळा करावी?

मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे कार्डिएक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी एका बेवसाईटशी बोलताना सांगितलं की, हृदयाची वेळेवर तपासणी केल्यामुळे आपण आपल्या हृदयाचं आरोग्य समजू शकतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन गंभीर परिस्थिती टाळू शकतो.

When to do heart checkup
Liver cancer early symptoms: लिव्हरचा कॅन्सर सुरू होण्यापूर्वी शरीरात दिसतात मोठे ७ बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच!

2023 मधील अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी जवळपास 30 टक्के मृत्यू हे हार्ट अटॅकमुळे होत असल्याचं समोर आलं आहे. त्यातही ईस्केमिक हार्ट डिजीज ही प्रमुख कारण ठरतायत.

मधुमेह, उच्च रक्तदाब, तणावपूर्ण जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अधिक तेलकट आणि मसालेदार अन्न, धूम्रपान आणि प्रदूषण हे सर्व घटक हृदयविकाराचं प्रमाण वाढवतायत. मुख्य म्हणजे शहरांमध्ये ही स्थिती अधिक गंभीर झाल्याचं दिसून येतंय.

भारतामध्ये लाखो लोकांना हृदयविकाराचा त्रास

भारतात हृदयविकार, हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक यासारख्या समस्या असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. एखाद्या व्यक्तीला हृदयविकार आहे का? त्याची तीव्रता किती आहे, त्यावरून तपासण्या किती वेळा करायच्या हे समजतं.

When to do heart checkup
Liver damage symptoms: पायांमधील 'हे' बदल सांगतायत लिव्हर खराब झालंय; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

कोणकोणत्या तपासण्या कराव्यात आणि किती वेळा?

रक्तदाब तपासणी (Blood Pressure Monitoring)

हृदयविकार असलेल्या रुग्णांनी आठवड्यातून 2-3 वेळा रक्तदाब तपासला पाहिजे. अचानक वाढलेला किंवा घसरलेला बीपी धोकादायक ठरू शकतो.

लिपिड प्रोफाइल – कोलेस्टेरॉल तपासणी

दर 6 महिन्यांनी ही तपासणी करून घेतली पाहिजे. जर कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढलेलं असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने तपासणीचे अंतर कमी करा. उच्च कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणतो. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा न होता हार्ट अटॅकचा धोका वाढतो

ईसीजी (ECG)

दर 6 महिन्यांनी ECG करून हृदयाचं आरोग्य व्यवस्थित आहे का हे तपासा.

स्ट्रेस टेस्ट

दरवर्षी एकदा स्ट्रेस टेस्ट करून हृदयावर ताण आल्यास त्याचा प्रतिसाद कसा आहे, हे समजतं.

When to do heart checkup
Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

ब्लड शुगर टेस्ट

दर 6 महिन्यांनी साखरेची तपासणी आवश्यक आहे, कारण मधुमेह हा हृदयविकाराचा मोठा धोका आहे.

Q

भारतात हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण किती आहे?

A

भारतात दरवर्षी जवळपास 30 टक्के मृत्यू हार्ट अटॅकमुळे होतात.

Q

40 वर्षांनंतर कोणती तपासणी नियमित करावी?

A

40 वर्षांनंतर नियमित हृदय तपासणी करणे अत्यावश्यक आहे.

Q

हृदयविकाराची जोखीम वाढवणारे मुख्य घटक कोणते?

A

मधुमेह, उच्च रक्तदाब, तणाव, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि अनियमित आहार हे मुख्य घटक आहेत.

Q

कोलेस्ट्रॉल तपासणी किती वेळा करावी?

A

हृदयरोगी रुग्णांनी दर 6 महिन्यांनी कोलेस्ट्रॉलची तपासणी करावी.

Q

स्ट्रेस टेस्ट का आणि किती वेळा करावी?

A

हृदयावर ताणाचा प्रभाव पाहण्यासाठी दरवर्षी एकदा स्ट्रेस टेस्ट करावी.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com