Manoj Jarange Patil addressing media, accusing government of plotting riots during Maratha quota agitation Saam Tv
Video

Manoj Jarange: सरकारला दंगल घडवून आणायचीय" – मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप|VIDEO

Maratha Reservation Protest Heads To Mumbai: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे की, मराठा आरक्षण आंदोलनात सरकार मुद्दाम दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे.

Omkar Sonawane

जालना : मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले आंदोलन आता मुंबईकडे वळणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन होत असल्यामुळे सरकार मुद्दाम गोंधळ घडवू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आम्ही मराठे हिंदु धर्माचे सर्व संस्कार पाळतो, वारकरी संप्रदाय पाळतो. गणेशोत्सव हा आमच्या लेकराबाळांच्या सुखासाठी आहे. आरक्षणसुद्धा त्याच सुखासाठी आहे. पण सरकार आमच्यावर चुकीच्या बातम्या पसरवते, असे जरांगे म्हणाले.

२९ ऑगस्टला आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत असून याच दिवशी मुंबईत जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई ही न्याय देणारी भूमी आहे. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. उत्सव आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही. मुंबईकरांनी आम्हाला समजून घ्यावे. आम्ही त्यांची लेकरं आहोत, गरीबाची लेकरं त्यांच्या दारात न्याय मागायला येत आहेत, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारवर थेट निशाणा साधत ते म्हणाले, सरकारला वाटतं मराठे मुंबईत यावेत आणि दंगल घडवून आणावी. आमच्या आंदोलनात घुसून घोषणा देणारे, जाळपोळ करणारे लोक आमचे नाहीत. सरकारचेच लोक मुद्दाम गोंधळ घडवतात. पोलिसांनी असे लोक ताबडतोब पकडले पाहिजेत. आम्ही शांततेत आझाद मैदानावर उपोषण करणार आहोत. पण सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे मराठा समाज चवताळला आहे. आरक्षणाचा निर्णय न घेता केवळ दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT