Manikrao Kokate Resignation News saam tv
Video

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

Anjali Damania statement on Kokate conviction : प्रतिनिधित्व अधिनियमाच्या सेक्शन ८ नुसार माणिकराव कोकाटे आमदार तसेच मंत्री राहू शकत नाहीत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

Namdeo Kumbhar

Manikrao Kokate disqualification under Representation of People Act : माणिकराव कोकाटे आता आमदार तसेच मंत्रीपदावर राहू शकत नाहीत, असा ठाम दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. प्रतिनिधित्व अधिनियम (Representation of People Act) मधील सेक्शन 8 नुसार कोणत्याही आमदाराला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेचा निर्णय झाल्यास त्याची आमदारकी पहिल्या दिवसापासून रद्द ठरते, असे दमानिया यांनी स्पष्ट केले. (Manikrao Kokate Resignation News)

दोषसिद्धीविरोधात संबंधित व्यक्तीला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असला तरी, अपील प्रलंबित असताना तो आमदार किंवा मंत्री राहू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सेक्शन 8(4) अल्ट्रा व्हायर्स ठरवून रद्द केल्यामुळे हा नियम तात्काळ लागू होतो, असे दमानिया यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांचे आमदारकी व मंत्रीपद तातडीने रद्द करून महाराष्ट्र शासनाने त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षे कैद आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने कोकाटे यांच्या अटकेचे निर्देश दिले असून, आज दिवसभरात त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT