शिंदेसेनेचे दिग्गज नेते तानाजी सावंतांच्या घरातच बंडखोरी saam tv
Video

जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेसेनेला मोठा धक्का, दिग्गज नेत्याच्या घरातूनच बंडखोरी, VIDEO

shinde sena rebellion dharashiv zp elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उडाला असून, शिंदेसेनेत आतापासूनच बंडाचे फटाके फुटू लागले आहेत. धाराशिवमध्ये शिंदेसेनेचा दिग्गज नेता आणि माजी मंत्र्याच्या घरातीलच व्यक्तीने बंडाचे निशाण फडकावले आहे.

Nandkumar Joshi

बालाजी सुरवसे, धाराशिव, साम टीव्ही

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जागावाटप आणि उमेदवारीवरून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. त्यात आता धाराशिवमध्येही शिंदेसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदेसेनेचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात त्यांच्याच पुतण्यानं दंड थोपटले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. धनंजय सावंत यांनी परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच, तर पंचायत समितीच्या दहा जागांवर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. सावंत यांनीच उमेदवार उतरवल्याने शिंदेसेनेला खिंडार पडले आहे. हा तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

पुण्यात 2000 झाडांची कत्तल होणार? 'ग्रीन कव्हर' धोक्यात, पुणेकरांचा संताप

Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना हिंदी सक्ती! पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटणार?

तमिळनाडूत मोठा राजकीय भूकंप! थलापती विजय यांना हादरा? आता पर्याय काय? डीएमके बाजी उलटवणार

SCROLL FOR NEXT