Ajit Pawar camp leaders joining the Uddhav Thackeray faction during a grand induction event at Matoshree. Saam Tv
Video

ठाकरेंचा पवारांना धक्का; मातोश्रीवर पार पडला बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश|VIDEO

Ajit Pawar Group Leaders Joined Uddhav Thackeray Faction: अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून संभाजीनगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगरमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी ठाकरे गटात प्रवेश केला. हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या राजकीय घडामोडींमुळे संभाजीनगरमधील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

शहरातील अजित पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश गाडेकर, भाजपचे सय्यद हय्यासा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची ताकद वाढली असून अजित पवारांना आणि भाजपला खिंडार बसले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: TET सक्ती विरोधात जालन्यात शिक्षक आक्रमक

Shocking : हृदयद्रावक! कपडे वाळत घालत असताना विजेचा शॉक लागला; बापलेकीचा जागीच मृत्यू

भारत-रशिया संबंधांना नवी गती; आरोग्य-शिक्षणासह अनेक निर्णायक करार|VIDEO

IndiGo Flight: मुंबई-दिल्ली, मुंबई-पुणे, विमानाचे तिकीट ५०-६० हजारांवर; एअरलाइन्स कंपन्यांकडून लुटामार सुरू

Shoes And Socks Benefits: बुटांमध्ये सॉक्स का घालतात? कारण काय?

SCROLL FOR NEXT