Badlapur Woman Egg Trafficking Case Update Saam Tv
Video

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Nashik IVF centre raid news : नाशिकमध्ये स्त्री बीज तस्करी प्रकरण उघडकीस आले असून डॉ. अमोल पाटील यांच्या मालती आयव्हीएफ सेंटरमधून वर्षभरात ९६ महिलांचे बीज काढल्याचा आरोप आहे.

Namdeo Kumbhar

Nashik IVF centre egg trafficking investigation case : नाशिकमध्ये स्त्री बीज तस्करीचा मोठा खुलासा झाला असून डॉ. अमोल पाटील याच्या केंद्रातून वर्षभरात ९६ महिलांचे बीज काढल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने भुजबळ फार्म परिसरातील 'मालती आयव्हीएफ सेंटर'वर धाड टाकून हे केंद्र सील केले. बदलापूर पोलिसांनी याप्रकरणी डॉक्टरला अटक केली असून केंद्राची नोंदणीही रद्द करण्यात आली आहे. आता नाशिक, ठाणे महापालिका आणि बदलापूर पोलीस या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत.

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर पोलिसांनी अटक केलेल्या संशयित डॉक्टर डॉ. अमोल पाटील याच्या नाशिकमधील आयव्हीएफ केंद्राची तपासणी केली असता मागील वर्षभरात तब्बल ९६ महिलांची बीज खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने भुजबळ फार्म परिसरातील मालती आयव्हीएफ सेंटरवर धाड टाकून महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले होते. या केंद्राला यापूर्वी सोनोग्राफी केंद्र, एआरटी लेव्हल टू, एआरटी बँक आणि सरोगसी क्लिनिकसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र या प्रकरणातील संशय वाढल्यानंतर मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या वैद्यकीय पथकाने ४ मार्च रोजी या केंद्राची नोंदणी रद्द करून केंद्र सील केले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक आणि ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच बदलापूर पोलिसांचे संयुक्त पथक करत असल्याने बीज तस्करी प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT