लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर भाजपनं आता कंबर कसलीय. खरतंर लोकसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा बनला होता. जागावाटपाच्या मतभेदांमुळे अनेक जागांवर शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर झाले होते. आता विधानसभेलाही काही वेगळी स्थिती नाही. महायुतीतील तिन्ही पक्ष किती जागांवर लढणार याचे आकडे जाहीरपणे देत आहेत. त्यासाठी भाजपनं मेगाप्लॅन आखल्याचं समजतंय. या रणनितीचा पहिला भाग आहे तो म्हणजे जागावाटपाचा..भाजप 155 ते 160 जागा लढण्यावर ठाम असल्याचं सूत्रांकडून समजतयं. . याचाच अर्थ उरलेल्या 128 ते 133 जागा शिंदे सेना, अजित पवार गट आणि मित्र पक्षांना दिल्या जातील. तर दुसरीकडे पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचं सरकार येणार असं छातीठोकपणे सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.