Nashik News SaamTv
Video

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Nashik News : एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे निकाल लागल्यानंतर आमदार फुटू नये म्हणून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व पक्षांकडून राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने नाशिकच्या ओझर विमानतळावर एक खासगी विमान दाखल झालं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Saam Tv

नाशिकच्या विमानतळावर खासगी विमान दाखल झालं आहे. नाशिकमधल्या ओझर विमानतळावरती हे खाजगी विमान तैनात करण्यात आलं आहे. अदानी ग्रुपचं हे विमान असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विधानसभा निवडणूकचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार, कोणाला बहुमत मिळणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र बहुमत मिळालं नाही तर अपक्ष आणि बंडखोर आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याच्या अनुषंगाने राज्यात राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसंच निकालानंतर आपल्या आमदारांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी त्यातच नाशिकच्या ओझर विमानतळावरती एक खासगी विमान दाखल झालं आहे. हे 6 सीटर खाजगी विमान अहमदाबादहून नाशिकमध्ये आलं असून ते अदानी ग्रुपचं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक प्रमाणेच जळगाव विमानतळावर देखील सिक्स सीटर खाजगी विमान तैनात ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT