Dhule recorded the lowest minimum temperature at 7.5°C as a severe cold wave grips Maharashtra. Saam Tv
Video

राज्यात थंडीची लाट, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली|VIDEO

Dhule Temperature Drops To 7.5 Degrees: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून धुळ्यात राज्यातील सर्वात कमी 7.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने 4 डिसेंबरपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Omkar Sonawane

संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून अनेक भागांमध्ये किमान तापमानाने सरासरीची पातळी ओलांडत खाली घसरल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर कडक थंडी जाणवत असून नागरिकांना सकाळ-संध्याकाळ कडाक्याची झळ सोसावी लागत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये 4 डिसेंबरपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात काल राज्यातील सर्वात कमी 7.5 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे धुळे सर्वाधिक थंड ठिकाण ठरले. अन्य भागांतही किमान तापमानात मोठी घट नोंदली गेल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात थंडीची जाणीव होत आहे.

हवामानातील या बदलामुळे सकाळी धुक्याचे प्रमाण वाढत असून शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कामगार वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Politics: बड्या नेत्यांना हवं भाजपचं वाशिंग मशिन? मित्र पक्षांनाही भाजपची भुरळ

Honeymoon Spot : कुठं कुठं जायाचं हनिमूनला? 'हे' आहे भारतातील बेस्ट लोकेशन, येथे जाताच स्वित्झर्लंड विसराल

SCROLL FOR NEXT