Maharashtra Pollution Control Board Chairman Siddhesh Kadam handing over ₹1 crore cheque to Chief Minister Devendra Fadnavis for flood relief in presence of Deputy Chief Ministers and Environment Minister. Saam Tv
Video

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा १ कोटी रुपयांचा निधी

Maharashtra Pollution Control Board: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी रुपये दान केले. या कृतीमुळे राज्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक मदतीचा हात मिळणार आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

राज्यभरात आलेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. याकरिता राज्यभरातील अनेक संस्थांकडून मदतीचे ओघ सुरू असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज मंत्रालयात सुपूर्द केला.

राज्यावर आलेल्या या संकटाला आर्थिक मदतीचा हातभार लावणं आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले आहे.

सिद्धेश कदम यांनी घेतलेला या निर्णयामुळे आता निमशासकीय अनेक महामंडळे पुढे येऊन मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

Kolhapur News : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Yellow Nails: नखांचा रंग पिवळा झालाय? वेळीच व्हा सावध, असू शकतो 'हा' गंभीर आजार

Asaduddin Owaisi: महाराष्ट्राच्या राजकारणात ओवैसींची एण्ट्री एमआयएमचा डोळा कुणाच्या मतांवर?

Sanjay Gaikwad: जमीन विकून आमदाराची 25 लाखांची मदत, संजय गायकवाडांच्या मदतीवर काँग्रेसचा आक्षेप

SCROLL FOR NEXT