Uddhav Thackeray Saam Tv
Video

Uddhav Thackeray: ...तर त्यांचा राजकीय खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा 'मनसे' इशारा

Uddhav Thackeray On BJP: मनसे-शिवसेना युतीची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खात्मा करून टाकू असे विधान उद्धव ठाकरे यांनी केली.

Priya More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. या ऐतिहासिक क्षणाची सर्वजण वाट पाहत होते. अखेर तो क्षण आज आला. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये राज- ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा खात्मा करू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आता जर आपण भांडत राहिलो तर तो संघर्ष आणि हुतात्मा स्मारकाचा अपमान होईल. आम्ही एकत्र आलो आहोत. एकत्र आलो आहोत तर एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवर आणि महाराष्ट्रवर कुणी वाकड्या नजरेने आणि कपटी कारस्थानाने बघितले आणि महाराष्ट्राला मुंबईपासून आणि मुंबईला मराठी माणसापासून वेगळं करेल त्याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ घेऊन आम्ही दोघे मैदानात उतरलो आहोत. उत्साह अमाप आहे. फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश बघत आहे. मी सर्वांना आवाहन करत आहे की विधानसभेवेळी भाजपने अपप्रचार केला होता की 'बटेगें तो कटेंगे' तसंच मी मराठी माणसांना सांगतो की आता जर का चुकाल तर संपाल. 'म्हणून तुटू नका आणि फुटू नका आणि मराठीचा वसा पुसून टाकू नका' असा संदेश मी युतीच्या वतीने सर्वांना देत आहे. मराठी माणूस कुणाच्या वाट्याला जात नाही आणि जर त्याच्या वाट्याला कुणी गेला तर त्याला परत जाऊन देत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'खरी शिवसेना आमचीच'! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

SCROLL FOR NEXT