Kandyache Thalipith : सकाळच्या नाश्त्यासाठी भारी पर्याय! 10 मिनिटांत बनवा कुरकुरीत कांद्याचं थालिपीठ

Sakshi Sunil Jadhav

साहित्याची तयारी

कांद्याचं थालिपीठ करण्यासाठी कणिक, ज्वारीचं पीठ, बेसन, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ आणि तेल लागते.

Thalipeeth Recipe

पीठ एकत्र करा

पसरट भांड्यात कणिक, ज्वारीचं पीठ आणि बेसन एकत्र करून त्यात हळद व चवीनुसार मीठ मिसळा.

Thalipeeth Recipe

मिरचीचा तिखटपणा

हिरव्या मिरच्या बारीक ठेचून किंवा मिक्सरमध्ये फिरवून पिठात घातल्यास थालिपीठाला छान झणझणीत चव येते.

Onion | pinterest

कांदा-टोमॅटोची भर

बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडा जाडसर चिरलेला कांदा पिठात घातल्याने थालिपीठ अधिक चविष्ट आणि कुरकुरीत होते.

Onion | pinterest

कोथिंबिरीचा स्वाद

बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घातल्यामुळे थालिपीठाला खमंग सुगंध आणि ताजेपणा मिळतो.

Thalipeeth Recipe | yandex

पीठ योग्य प्रमाणात भिजवा

थोडं थोडं पाणी घालत पीठ मळा आणि ते ना खूप घट्ट ना खूप पातळ राहील याची काळजी घ्या.

Thalipeeth

तव्यावर थालिपीठ थापा

तव्याला थोडं तेल लावून पिठाचा गोळा ठेवावा आणि हाताला तेल लावून त्यावर थालिपीठ व्यवस्थित थापून घ्यावं.

Thalipeeth

झाकण ठेवून शिजवा

थालिपीठ तव्यावर ठेवल्यानंतर झाकण ठेवून ते वाफेवर शिजवा आणि खालची बाजू हलकी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

Thalipeeth

गरमागरम सर्व्ह करा

तयार कांद्याचं खमंग आणि कुरकुरीत थालिपीठ दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी खुलते.

Onion Thalipeeth

NEXT: अचानक धूसर दिसतंय? रोजच्या या 7 सवयींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

dry eye symptoms
येथे क्लिक करा