Alisha Khedekar
फोडणी देताना स्वयंपाकघरातील खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. धूर बाहेर गेल्याने ठसका कमी होण्यास मदत होते.
मोहरी, मिरची किंवा मसाले टाकताना गॅसची आच कमी करा. जास्त आचेवर धूर वाढून खोकला येऊ शकतो.
फोडणी देण्यापूर्वी एक्झॉस्ट फॅन सुरू करा. स्वयंपाकघरातील धूर बाहेर गेल्याने हवेत मसाल्यांचे कण साचत नाहीत.
सुक्या लाल मिरचीची फोडणी देताना विशेष काळजी घ्या. वारंवार ठसका लागत असल्यास फोडणीतील सुक्या मिरचीचे प्रमाण कमी करून पाहा.
फोडणी झाल्यानंतर लगेच भांड्यावर झाकण ठेवा. यामुळे उडणारा धूर कमी होऊन ठसका आणि खोकल्याचा त्रास टाळता येतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा