Suresh Dhas Meets Dhananjay Munde Saam Tv
Video

Maharashtra Politics: सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट, पंकजा मुंडेंना नियंत्रात ठेवण्याचा प्रयत्न

Suresh Dhas Meets Dhananjay Munde: सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. पंकजा मुंडे यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजपकडून धनंजय मुंडे यांचा बचाव केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Priya More

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. सतत धनंजय मुंडेंवर आरोप करत असलेल्या आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचीच भेट घेतली यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. मात्र यामागची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागली आहे. पंकजा मुंडे यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजपकडून धनंजय मुंडे यांचा बचाव केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बीडमधून धनंजय मुंडे यांचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडे यांचा रस्ता मोकळा होऊ शकतो त्यामुळेच धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने वेगळे पत्ते फेकले असल्याची चर्चा सुरू आहे.

भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपकडून पडद्या आडून तर हालचाली सुरू नाही आहेत ना याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सतत आरोप करणारे सुरेश धस आणि धनंजय मुडे यांच्यात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून धनंजय मुंडे यांचा बचाव करण्याची रणनीती आखली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

SCROLL FOR NEXT