Maharashtra Politics : गंगाधर ही शक्तिमान हैं! सुरेश धस-धनंजय मुंडे गुप्त भेटीनंतर अंधारेंना वेगळाच संशय

Suresh Dhas And Dhananjay Munde Meeting : सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांनी कडाडून टीका केली आहे.
Suresh Dhas And Dhananjay Munde Meeting
Suresh Dhas And Dhananjay Munde Meetingsaam tv
Published On

संतोष देशमुख प्रकरणावरून प्रत्येक सभेत 'आकाचा आका कोण?' असा सवाल करून धनंजय मुंडेंकडं अप्रत्यक्षपणे 'अंगुलीनिर्देश' करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी आता स्वतःच धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला फोडणी दिली. ही गुप्त भेट असल्याचं सांगण्यात येत होतं. आता या भेटीवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, तसेच अंजली दमानिया यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बोलणारे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना साडेचार तास भेटले किंवा चार मिनिटं भेटले काय हे महत्वाचं नाही. तर या सगळ्या धामधुमीत सुरेश धस असे करूच कसे शकतात, असा रोखठोक सवाल सुषमा अंधारे यांनी केला. कधी नाशिकला जाऊन सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी पोलिसांना माफ करा, असं म्हणतात तर आता धनंजय मुंडे यांना जाऊन भेटतात. अशी संधिग्धता ते निर्माण कसे करू शकतात, असा प्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केला.

ते फडणवीसांची विश्वासार्हता गमावताहेत - अंधारे

धनंजय मुंडे यांची भेट घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. सुरेश धस हे स्वतःची विश्वासार्हता गमावत नाहीत, तर ते देवेंद्र फडणवीस यांचीही विश्वासार्हता गमावत आहेत, याकडं अंधारे यांनी लक्ष वेधलं. स्थानिक स्वराज्य संस्थेत बीड जिल्ह्यामध्ये शिरकाव करायचा होता. मराठा नेता व्हायचं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा बाहुबली प्रस्थापित करायची होती. ते काम त्यांचे फत्ते झालेलं आहे. आता आपण कोणाच्या गळ्यात गळे घालून भेटलो तरी काय, असं त्यांना वाटत असेल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. देशमुख कुटुंबाबद्दल वाईट वाटत आहे. ज्यांनी एवढा विश्वास धस यांच्यावर टाकला होता, तो आज मातीमोल ठरवला आहे. 'गंगाधर ही शक्तिमान हैं' एवढंच खेदाने म्हणावसं वाटतंय, असेही त्या म्हणाल्या.

दुःखंही होतंय आणि रागही येतोय

धनंजय मुंडे आणि सुरेश धस भेटीवर अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय. ही भेट झाल्याचे चार-पाच दिवसांपूर्वीच मला कळालं होतं. ती भेट बावनकुळेंनी करून दिली होती. ती फक्त ऐकिवातली गोष्ट होती, म्हणून काही बोलले नाही. आता धस आणि बावनकुळेंनीही दुजोरा दिला आहे. या भेटीनंतर मला अतिशय दुःख होतंय आणि राग सुद्धा येतो, हे राजकीय सेटिंगनं होतंय, असं दमानिया म्हणाल्या.

Suresh Dhas And Dhananjay Munde Meeting
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंसाठी मुलगा सीशिव उतरला मैदानात, पोस्ट झाली व्हायरल | Video

डायलॉग ऐकून कान किटले - दमानिया

धस-मुंडे भेटीवर दमानिया यांनी कडाडून टीका केली. धस म्हणताहेत की मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. डोळ्याच्या ऑपरेशनसाठी थेट हॉस्पिटलमध्ये जायची गरज नव्हती. बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाहीत, मतभेद आहेत. हा डायलॉग ऐकून कान किटले. मला फडणवीसांचाही आज राग येतोय, असे दमानिया म्हणाल्या.

Suresh Dhas And Dhananjay Munde Meeting
Suresh Dhas meets Dhananjay Munde: धस-मुंडे संघर्षात ट्विस्ट; सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्तभेट, तब्बल साडेचार तास चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com