Uddhav thackeray On Mumbai Saam tv
Video

Uddhav Thackeray: मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Uddhav thackeray On Mumbai: मनसे-शिवसेना युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करण्याना थेट इशारा दिला. त्यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाल्याचे ते म्हणाले.

Priya More

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा केली. युतीची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांनी भाजपसह महायुतीवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण काढत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचा जन्म मराठी माणसांच्या हक्कासाठी झाला असल्याचे सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, 'संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो मंगल कलश आणला गेला तो सत्यनारायणाच्या पूजेसाठी नाही आणला गेला. त्यामागे खूप मोठा संघर्ष आहे. १०५ -१०७ किंवा त्याहून जास्त मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आठवण आज होणे स्वाभाविक आहे. मुंबईसाठी संपूर्ण ठाकरे घराण्याने संघर्ष केला होता. मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईतच मराठी माणसाच्या उरावर उपरे नाचायला लागले. त्यावेळी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. पुढच्या वर्षी शिवसेनाला ६० वर्षे होतील. इतकी वर्षे व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतोय की मुंबईचे लचके आणि चिंधड्या उडवत आहेत हे मनसुबे. त्यावेळी ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे हे मनसुबे आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणत्या भाज्या रोजच्या आहारात असाव्यात? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

प्रजासत्ताक दिनी धक्कादायक प्रकार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न|VIDEO

Maharashtra Politics: ऐन ZP निवडणुकीत ठाकरे सेनेला मोठा धक्का; माजी आमदाराने पक्ष सोडला, कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

डुप्लिकेट दारू ब्रँडेड कंपनीच्या बाटल्यांमध्ये, लाखोंचा मुद्देमाल जप्त; एक्साईज विभागाची मोठी कारवाई

Moong Dal Halwa Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट मूग डाळ हलवा वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT