Shiv Sena leader and Industries Minister Uday Samant addressing the media in Mahad over the Raigad Guardian Minister issue. Saam Tv
Video

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? उदय सामंतांनी थेट वर्ष आणि महिनाच सांगितला|VIDEO

Uday Samant Statement On Raigad Guardian Minister: रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा कधी सुटणार? शिवसेना नेते उदय सामंत यांनी थेट 2026 च्या जानेवारीचा उल्लेख करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे निर्णयाची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुरू असून तो अद्यापही कायम आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये अदिती तटकरे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र या नावांना महायुतीमधील पक्षांनी विरोध दर्शवल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय मागे घेतला होता. आता यावरच शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.

रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं असा आग्रह पुन्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज महाडमध्ये व्यक्त केला. माझं स्पष्ट मत या बाबतीत शिवसेनेला मिळावं हेच आहे. मात्र याबाबतचा निर्णय हा राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घ्यावा. शिवाय हा निर्णय लवकरात त्यांनी घ्यावा येत्या नवीन वर्षात हा प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त करताना 2026 च्या जानेवारीमध्ये हा प्रश्न सुटावा अशी विनंती सामंत यांनी तीनही नेत्यांना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCPच्या नेत्यावर दिवसाढवळ्या गोळीबार; अज्ञात हल्लेखोरांचा बांगलादेशात कहर

Tuesday Horoscope: जवळचा व्यक्तीच देईल धोका, ५ राशींचा पैसा जाणार वाया; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: डोंबिवली येथील लक्ष्मी सागर इमारतीच्या टेरेसच्या भिंतीचा भाग कोसळला

Migraine Pain: मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी 'या' सवयींचे पालन करणं अत्यंत महत्वाचं

Diabetes Bad Habits: डायबेटिसचा त्रास आहे? ही १ वाईट सवय झटक्यात वाढवते ब्लड शूगर लेव्हल, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT