Sharad Pawar arriving to meet Deputy Chief Minister Sunetra Pawar during the condolence meet in Baramati. Saam Tv
Video

शरद पवार उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला, घडामोडींना वेग|VIDEO

Sharad Pawar Meeting Sunetra Pawar After Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर आज शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार असून या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राजकीय वर्तुळासह राज्यात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम करून सुनेत्रा पवार ह्या मुंबईला रवाना झाल्या आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी उममुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र शरद पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधी बद्दल आपल्याला काही माहीत नाही असे सांगितल्यानंतर सर्वांच्याच राजकीय भुवया उंचावल्या आहेत. या शपथ विधिनंतर शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची काही भेट झाली नव्हती. दरम्यान आज शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं असून या शोकसभेला शरद पवार उपस्थित राहणार आहे. यावेळी ते सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. तर राजेंद्र पवार, रोहित पवार आणि प्रतिभा पवारही या शोकसभेला उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT