Eknath Shinde Saam tv
Video

Maharashtra Politics: शिंदेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकाला दणका, पोलिसांकडून गुन्हा दाखल

shinde sena corporator booked for sword rally: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकाविरोधात पोलिसांनी कारवाई केली. विजयानंतर काढलेल्या मिरवणुकीत तलवार नाचवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

Priya More

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये विजयी झाल्यानंतर शिंदेसेनेचे अभिजीत जीवनवाल या नवनिर्वाचित नगरसेवकाने मिरवणुकीत तलवार नाचवली होती. या नगरसेवकाने पराभूत झालेल्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घरासमोरून रॅली काढत तलवार दाखवली होती. त्यावरून वेदांत नगर पोलिस ठाण्यामध्ये त्या नवनियुक्त नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल झाला. दुसरीकडे त्याच प्रभागांमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट आणि त्यांचा पीए राजू राजपूत यांनीही विजयी मिरवणूक काढताना तलवार नाचवली होती. मात्र या दोघांवर गुन्हा दाखल केला नाही. आता यावरून माजी खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित केलाय. कायदा आणि न्याय हा श्रीमंतासाठी वेगळा आणि गरिबासाठी वेगळा असतो का? असा प्रश्न उपस्थित करीत पोलिसांना याबद्दल विचारणार असल्याचं त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नुसती क्रिम लावून फायदा नाही! ग्लोईंग स्किनसाठी डाएटमध्ये खा 'हे' ५ पदार्थ

Maharashtra News Live Update: कांद्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक,दोन्ही उपमुख्यमंत्री असणार उपस्थित

Shocking : भयंकर! बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरने साधली संधी; धाकट्या बहिणीवर अत्याचार करून काढला पळ

Famous Actress : "मेरे करण, अर्जुन आ गए..."; ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, जुळ्या मुलांना दिला जन्म

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीसोबत काँग्रेस करणार युती? बड्या नेत्याच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT