Manasvi Choudhary
हेल्दी, फिट राहण्यासह त्वचेची चमक टिकवण्यासाठी योग्य आहार करणे महत्वाचे आहे. तुम्ही त्वचेवर काय लावता यापेक्षा तुम्ही आहारात काय खाता? हे महत्वाचे आहे.
तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा परिणाम चेहऱ्यावर होतो. तेलकट, तिखट, जंक फडू खाल्ल्याने त्वचा खराब होते. त्वचेवर लाल डाग, मुरूम, पुळ्या येतात.
चेहऱ्याचं सौंदर्य टिकवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या.
खरबूज खाल्ल्याने त्वचेवरील मृतपेशी कम होतात त्वचा ग्लो करते. सुरकुत्या कमी होतात.
चेरी अँथोसायनिन या द्रव्यांमुळे लाल असते. हे द्रव शरीराला ऑक्सिजन, नायट्रोजन आणि अतिनिल किरणांच्या प्रभावापासून रोखते. यामुळे त्वचा टवटवीत दिसते.
चीया सीड्स पाण्यात टाकून ते पाणी प्याय्लायने त्वचेचे फ्री रॅडिकलपासून संरक्षण होते व त्वचा तरूण दिसते.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने त्वचा फ्री रॅडिकलशी लढते यामुळे त्वचा तरूण आणि टवटवीत दिसते.
जेवणात ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्यास त्वचा मऊ आणि केसांना देखील फायदा होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.